Pushpak Express Accident : जळगावात मोठी दुर्घटना! एक अफवा आणि सात जणांचे तुकडे, घटनास्थळाचा पहिला भयानक फोटो

Last Updated:

Pushpak Express Accident : जळगावच्या पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरूवात केली अन् समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने प्रवाशांना उडवल्याची माहिती मिळतीये.

News18
News18
Pushpak Express Accident : जळगावच्या पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरूवात केली अन् समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने प्रवाशांना उडवल्याची माहिती मिळतीये. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. अनेक प्रवाशांचे तुटलेले हात आणि पाय पटरीवर पडले आहेत. त्याचे भयानक फोटो समोर आले आहेत.

नेमकं काय झालं?

पुष्पक एक्सप्रेस ही नेहमीप्रमाणे प्रवास करत आहे. अचानक कोणीतरी ट्रेनमध्य आग लागल्याची अफवा पसरली त्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. त्यावेळी बंगळुरू एक्सप्रेस समोरून येत होती त्याखाली प्रवासी चिरडले गेले आहेत. यामध्ये अनेक प्रवासी चिरडले गेले आहेत. ट्रेनमध्ये कोणतीही आग लागलेली नव्हती. पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक मारल्याने काही ठिणग्या उडाल्या त्यानंतर आगीची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली.
advertisement
Pushpak Express Accident
Pushpak Express Accident
पुष्कर एकस्प्रेस जागेवर उभी होती. बोगीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यात सात ते आठ जण जखमी झाले आहे. तर काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना 4:20 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी एक रुग्णवाहिका हजर आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
advertisement
दरम्यान, घटनास्थळावरील 108 अॅम्ब्युलन्स अॅक्टिव करण्यात आल्या आहेत. प्रांतअधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलीस अधिकारी देखील तिथं पोहोचले आहेत. तीन हॉस्पिटल्सला तातडीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत, असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pushpak Express Accident : जळगावात मोठी दुर्घटना! एक अफवा आणि सात जणांचे तुकडे, घटनास्थळाचा पहिला भयानक फोटो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement