सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली, धक्कादायक वक्तव्य
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांनी जनतेला संबोधित केले.
जत, सांगली : राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप नेते सदाभाऊ खोत यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. "महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे, असे जाहीर सभांमधून सांगतोय. तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का?" अशी अभद्र टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीला खोत यांनी जोरदार लक्ष्य केले. टीका करताना नेहमीप्रमाणे त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला.
तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? सदाभाऊ खोत यांची अभद्र टीका
शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, तरी भागले नाही. तरीही भाषणांमधून महाराष्ट्र बदलायचा असे सांगत फिरतोय. तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
advertisement
माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार? याची पवारसाहेबांना काळजी
महाविकास आघाडीवाले देवेंद्र फडणवीसांना का घेरायला लागली आहेत माहितीय का? आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्या घरात गाय असते. राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे. गायीच्या कासेला चार थानं असातत. यामधील अर्ध थान वासऱ्याला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं, असा यांचा धंदा होता. पण चारही थानांचं दूध वासरांनाच द्यायचे काम फडणवीस यांनी केले. म्हणून पवारसाहेबांना माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार? याची काळजी वाटू लागली, असे सदाभाऊत खोत म्हणाले.
advertisement
गोपीचंद पडळकर यांना निवडून द्या, दुष्काळ हटवतो
गोपीचंद पडळकर जतमधून विधानसभा लढवत आहेत. त्यांना या विधानसभा निवडणुकीत निवडून द्या. जतचा विकास करून जत एक नंबरवर नेतो. येथील दुष्काळ हटवतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काही लोकांनी जतचा दुष्काळ पुसण्यासाठी किंचितही प्रयत्न केले नाहीत. जत तालुक्यातील 64 गावातील दुष्काळ आपण कायमचा हटवू, असे फडणवीस म्हणाले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 06, 2024 5:05 PM IST