बर्थडेच्या 4 दिवस आधी सक्षमला मारलं, आता GF आंचल करणार त्याचं स्वप्न पूर्ण, मनाला चटका लावणारी स्टोरी

Last Updated:

नांदेडमध्ये अंतरजातीय प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सक्षम ताटे नावाच्या २० वर्षीय तरुणाची प्रेयसीच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून हत्या केली आहे.

News18
News18
नांदेडमध्ये अंतरजातीय प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सक्षम ताटे नावाच्या २० वर्षीय तरुणाची प्रेयसीच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून हत्या केली आहे. आरोपींनी आधी गोळ्या घातल्या त्यानंतर फरशीने डोकं ठेचून खून केला आहे. या हत्याकांडानंतर प्रेयसी आंचल मामीडवारने आपल्या वडिलांसह दोन्ही भावांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच तिने आपण सक्षमचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे.
आंचल मामीडवारने सांगितलं की, १ डिसेंबरला सक्षमचा वाढदिवस होता. वाढदिवसानंतर तो मला घेऊन जाणार होता. पण वाढदिवसाच्या चार दिवस आधी त्याची हत्या करण्यात आली. मी अधिकारी बनावं, हे सक्षमचं स्वप्न होतं. यासाठी तो मला शिक्षणात मदत करत होता. आता त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार, असंही आंचलने सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेच्या दिवशी सकाळी आंचलचा लहान भाऊ तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता. 'सक्षमविरोधात तक्रार दे,' असा दबाव तिच्यावर टाकला. मात्र, आंचलने पोलिसांसमोर स्पष्ट सांगितले की, तिला तक्रार द्यायची नाही. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने आंचलच्या भावाला उद्देशून, 'रोज मारामाऱ्या करून येतोस, बहिणीचं ज्याच्यासोबत प्रेम आहे त्याला मारून ये' असे सांगितले. त्यामुळे पोलिसानेच भावाला भडकावल्याचा आरोपही आंचलने प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
advertisement
विशेष म्हणजे यापूर्वी आंचलने सक्षम विरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दिली होती. पण ही तक्रार वडील आणि भावांच्या दबावातून दिली होती. १८ वर्षे पूर्ण होताच तिने कोर्टात समक्ष जाऊन सक्षमच्या बाजुने साक्ष दिली होती. आता पुन्हा तिच्यावर सक्षमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव होता. पण तिने गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर आंचलचे कुटुंबीय तिला देवदर्शनाच्या नावाखाली आजोळी घेऊन गेले तर, दुसरीकडे आंचलचे वडील गजाजन मामीडवार आणि तिच्या दोन भावांनी सक्षमची निर्घृण हत्या केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बर्थडेच्या 4 दिवस आधी सक्षमला मारलं, आता GF आंचल करणार त्याचं स्वप्न पूर्ण, मनाला चटका लावणारी स्टोरी
Next Article
advertisement
Rubaiya Sayeed Kidnapping Case : गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झाली होती सुटका
गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झालेली सुटक
  • गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झाली होती स

  • गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झाली होती स

  • गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झाली होती स

View All
advertisement