Sangli Crime : उत्तम मोहिते निवडणूक लढवणार होते, सांगलीच्या 'मुळशी पॅटर्न' हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!

Last Updated:

Sangli Uttam Mohite Murder Case : उत्तम मोहिते हे निवडणूक लढवणार होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली का? असा सवाल विचारला जात आहे.

News18
News18
Sangli Uttam Mohite Murder Case : सांगलीमध्ये दुहेरी हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उत्तम मोहिते असं खून करण्यात आलेल्या दलित महासंघाच्या अध्यक्षाचे नाव आहे. उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी पटर्न चित्रपटातील दृश्यप्रमाणे हा खून करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते. वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला.

उत्तम मोहिते निवडणूक लढवणार होते  

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मयत पावलेले उत्तम मोहिते आणि हल्लेखोर श्याब्या उर्फ शाहरूख शेख यांच्यात वर्चस्वातून वाद होता. याच कारणातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तर या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. उत्तम मोहिते हे निवडणूक लढवणार होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली का? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement

बर्थडे पार्टीमध्ये जेवण झाल्यानंतर...

घटनेच्या दिवशी मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या घरासमोर स्टेज टाकून जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. बर्थडे पार्टीमध्ये जेवण झाल्यानंतर आरोपींचा मयत उत्तम मोहिते यांच्यासोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आठ ते दहा आरोपींनी घरात घुसून मोहिते यांना भोसकलं.

माझ्या भावावरही हल्ला झाला...

advertisement
उत्तम मोहिते यांच्या मुलीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गणेश मोरे नावाच्या गुंडावर आरोप केले आहेत. गणेश मोरे याने काल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्या भावावरही हल्ला करण्यात आला. मात्र, त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप उत्तम मोहिते यांच्या मुलीने केला आहे.

हत्येतील आरोपी समोर

advertisement
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मोहिते यांच्या हत्येतील आरोपी समोर आले असून यामध्ये गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, आणि समीर ढोले यांचा समावेश आहे. उत्तम यांच्यावर आरोपींनी चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे आणि काठी घेऊन घरात शिरून पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात, हातावर वार करून गंभीर जखमी करून खुन केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli Crime : उत्तम मोहिते निवडणूक लढवणार होते, सांगलीच्या 'मुळशी पॅटर्न' हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement