सांगलीकरांना दिवाळीचं गिफ्ट! प्रवाशांच्या सेवेसाठी ST चा मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
दिवाळीनिमित्त सांगलीतील प्रवाशांसाठी एसटीने खूशखबर दिलीये. जिल्ह्यातून 78 अतिरिक्त बस धावणार असून भाडेवाढही करण्यात आलेली नाही.
सांगली : दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठी असते. अनेकजण या काळात एसटीने प्रवास करतात. त्यामुळे गर्दीची समस्या निर्माण होते. यासाठीच राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सांगलीतील प्रवाशांसाठी खूशखबर दिलीये. दिवाळीनिमित्त सांगली जिल्ह्यातील 10 आगारांतून 78 जादा बसेस सुरू झाल्या आहेत. आज, 25 ऑक्टोबरपासून या बसेस सोडण्यात येत असून, मागणी असेपर्यंत या जादा बसेस धावणार आहेत. या जादा गाड्यांचे एकूण 39 हजार 237 किलोमीटरचे अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे.
या आगारातून धावणार जादा बसेस
सांगलीतील 10 आगारांतून 78 जादा बस धावणार आहेत. यात सांगली 6, मिरज 6, इस्लामपूर 5, तासगाव 10, विटा 1, जत 4, आटपाडी 3, कवठेमहांकाळ 3, शिराळा 7, पलूस 3 येथून जादा बस धावणार आहेत. या जादा बसेस मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, सातारा, कराड, शिर्डी, बोरिवली, नांदेड, रोहा, इचलकरंजी या मार्गावर धावणार आहेत. नव्याने सुरू करावयाच्या फेऱ्या या 25 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने गर्दीमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन सुरू करण्यात येणार आहेत. जादा वाहतुकीसाठी 120 चालक व 120 वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
यंदा हंगामी भाडेवाढ नाही
प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली विभागामार्फत दिवाळीसाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी सांगली विभागातील सर्व आगारामधून प्रवाशांची सोय करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटीची भाडेवाड केली जाते. परंतु, यंदा दिवाळीसाठी कोणतीही भाडेवाड केलेली नाही, असे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले. दिवाळीत केली जाणारी 10 टक्के हंगामी भाडेवाढ झाली नसल्याने यंदा प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
October 25, 2024 1:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगलीकरांना दिवाळीचं गिफ्ट! प्रवाशांच्या सेवेसाठी ST चा मोठा निर्णय