दिवाळीसाठी रेल्वेचं खास गिफ्ट; सांगली, कोल्हापूरसाठी विशेष गाडी, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Diwali Special Train: सांगली, कोल्हापूरसह इचलकरंजीत दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे रेल्वेने विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीसाठी रेल्वेचं खास गिफ्ट; सांगली, कोल्हापूरसाठी विशेष गाडी, पाहा वेळापत्रक
दिवाळीसाठी रेल्वेचं खास गिफ्ट; सांगली, कोल्हापूरसाठी विशेष गाडी, पाहा वेळापत्रक
सांगली: कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीच्या प्रवाशांसाठी रेल्वेनं खूशखबर दिलीये. दिवाळीसाठी या ठिकाणांहून विशेष गाड्या धावणार आहेत. सांगली, कोल्हापूरसह इचलकरंजीत दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे रेल्वेने विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आता सांगली रेल्वे स्थानकावरून जबलपूर, प्रयागराज, पटना, मुजफ्फरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे.
सुट्ट्यांमधे प्रवासासाठी अशी धावणार गाडी
दिवाळीनिमित्त सुट्यांमध्ये ये-जा करण्यासाठी विशेष गाडी सुरू करण्यात आलीये. हुबळी-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस (क्रमांक 07315) ही गाडी सांगली स्थानकावर थांबणार आहे. सांगलीतून जबलपूर, प्रयागराज, पटना येथे जाण्यासाठी प्रवाशांची सोय झाली आहे. हुबळी येथून 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:20 वाजता ही गाडी सुटेल आणि 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुजफ्फरपूर स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07316 ही व्हाया पटना जाणारी प्रयागराज, जबलपूर, सांगलीमार्गे धावेल. मुजफ्फरपूर येथून दुपारी 1:15 वाजता सुटून 9 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हुबळीला पोहोचेल.
advertisement
या प्रवाशांना होणार फायदा
सांगली स्थानक ते पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पीटी, दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर आणि हाजीपूर, असा प्रवास करता येईल. प्रवाशांना रेल्वेच्या विशेष फेरीचा फायदा होणार आहे.
advertisement
तिकीट काढताना टाकावे बोर्डिंग स्टेशन
या गाडीचे तिकीट काढताना बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे, असे आवाहन सांगली डेव्हलपमेंट ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
दिवाळीसाठी रेल्वेचं खास गिफ्ट; सांगली, कोल्हापूरसाठी विशेष गाडी, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement