Sangli News : माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या, मृतदेह रस्त्यावर, सांगलीत खळबळ

Last Updated:

सांगलीत माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. हत्येनंतर मृतदेह रस्त्यातच दुचाकीशेजारी पडून होता.

News18
News18
सांगली : सांगलीत माजी उपसरपंचाचा रस्त्यात गळा चिरून खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. माजी उपसरपंच आणि सराफव्यावसायिक बापूराव देवाप्पा चव्हाण असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हल्ला करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गार्डी इथल्या नेवरी रस्त्यावर ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बापूराव चव्हाण यांचं विट्यात सराफ दुकान आहे. याशिवाय गार्डी ते नेवरी रस्त्यावर पोल्ट्रीचा व्यवसाय सुद्धा आहे. २०१८ ते २०१३ या काळात ते घानवड गावचे उपसरपंच होते. गुरुवारी दुपारी तीन वाजते ते गार्डी ते नेवरी रस्त्यानं दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा गावच्या बाहेरच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. गळ्यावर चाकूने वार करत हत्या केली.
advertisement
बापूराव चव्हाण यांच्या हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह पंचनाम्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli News : माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या, मृतदेह रस्त्यावर, सांगलीत खळबळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement