Solapur: डॉ. वळसंगकर मृत्यू प्रकरण: कामावर परत घेण्यासाठी मानसिक दबाव? चिठ्ठीत काय लिहिलं होतं?

Last Updated:

Dr Shirish valsangkar: डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून मनीषा माने यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर
डॉ. शिरीष वळसंगकर
सोलापूर : सोलापूरसह राज्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी घटना सोलापुरात शुक्रवारी रात्री घडली. सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या पिस्तुलाने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्यासोबत गेल्या 25 वर्षांपासून काम करणाऱ्या मनीषा कुसळे-माने यांना जबाबदार धरत अटक करण्यात आली. डॉ. वळसंगकर यांना मनीषा माने यांनी कामावर परत घेण्यासाठी मानसिक दबाव दिल्याचा आरोप आहे. यासंदर्भात डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी दिलेल्या चिठ्ठीत उल्लेख करण्यात आला आहे.
डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून मनीषा माने यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महिला कामगाराच्या धमकीला बळी पडून डॉ. वळसंगकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिकृदृष्ट्या सांगितले जात आहे. डॉ. वळसंगकर यांच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

महिला कर्मचारी मनिषा यांच्याकडून मानसिक दबाव?

advertisement
डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. डॉ. वळसंगकर यांनी आतापर्यंत मेंदूसंबंधित हजारो रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे. मेंदू विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉ. शिरीष वळसंगकर यांचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात नाव होते. मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून सोबत काम करणाऱ्या महिला कर्मचारी मनिषा यांच्याकडून मानसिक दबाव दिला जात असल्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात मनीषा माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement

मनीषा माने या डॉ. वळसंगकर यांच्यासोबत २५ वर्षांपासून काम करीत होत्या

मनीषा माने ह्या गेल्या २००८ पासून वळसंगकर हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. मनीषा माने यांच्याकडून डॉ. वळसंगकर यांना पगार कपात होत असल्यामुळे १७ एप्रिल २०२५ रोजी मेल केला गेला. त्यामध्ये आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. डॉक्टर वळसंगकर यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवल्यानंतर माने यांनी त्यांची माफी मागितली. मात्र त्यानंतर डॉक्टर वळसंगकर स्वतः गोळ्या झाडून आत्महत्या केली असे या एफआयआरमध्ये म्हणले आहे. मनीषा माने यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या अशिलाला अडकविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सत्य परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न होत आहे, असे मनीषा यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
advertisement
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आपल्या स्वतःच्या रिवाल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहत्या घरी बेडरूममधील वॉशरूममध्ये आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होत होते, याकडे सगळ्यांच्या नजरा असतील.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: डॉ. वळसंगकर मृत्यू प्रकरण: कामावर परत घेण्यासाठी मानसिक दबाव? चिठ्ठीत काय लिहिलं होतं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement