गर्भवती महिलेला चार महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, सोलापुरात धक्कादायक घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur Woman Beaten In Pregnancy: सोलापूर शहरातील तुळजाई नगर भागात अज्ञात कारणावरून तीन चार महिलांनी सात महिन्यांच्या गरोदर महिलेला मारहाण केली.
प्रीतम पंडित, सोलापूर : गर्भवती महिलेला तीन ते चार महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सात महिन्यांच्या गरोदर महिलेच्या पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सोलापुरात घडली आहे.
सोलापूर शहरातील तुळजाई नगर भागात अज्ञात कारणावरून तीन चार महिलांनी सात महिन्यांच्या गरोदर महिलेला मारहाण केली. शिल्पा कृष्णा मिस्किन (वय २४) असे मारहाण झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. घडलेल्या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार महिलेचा मुलगा एका कारखान्यात कामाला आहे. तिथे एक मुलगी त्याच्याशी बोलण्याचा वारंवार प्रयत्न करते. दोघांमध्ये बोलणेचालणे झाल्याने मुलीच्या घरच्यांना राग आल्याने त्यांनी मुलाला आणि त्याच्या बायकोला म्हणजेच माझ्या गरोदर सुनेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गर्भवती असूनही तिच्या पोटावर आणि पाठीवर इजा होईल, अशी गंभीररित्या मारहाण केली.
advertisement
आमची काही चूक नाही, असे आम्ही सांगत असतानाही त्यांनी मागेपुढे न पाहता मारहाण सुरूच ठेवली. त्यांनीच आम्हाला मारहाण करूनही पोलीस स्टेशनमध्ये आमच्या नावाची तक्रार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही केवळ आरोप करतोय, असे नाही तर आमच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे, पोलिसांनी आणि माध्यमांनी पडताळणी करून घ्यावी, असे तक्रारदार महिला प्रभावती मिस्कीन यांनी सांगितले.
advertisement
मारहाण झालेल्या गर्भवती महिलेची प्रकृती सध्या ठीक असून सदर गर्भवती महिलेवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 08, 2025 3:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गर्भवती महिलेला चार महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, सोलापुरात धक्कादायक घटना