सोलापुरात पक्ष्यांसाठी वाटली 1 हजार मोफत जलपात्रे, माजी विद्यार्थ्यांचा अनोखा पाणपोई उपक्रम Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापुरातील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या 1988 च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी हा अनोखा असा हा पक्ष्यांसाठी उपक्रम सुरू केला आहे.
सोलापूर - सोलापुरात पक्ष्यांसाठी चार हुतात्मा चौक येथे सकाळी सात वाजल्यापासून पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासीयांना एक हजार जलपात्र मोफत वाटण्यात आली. सोलापुरातील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या 1988 च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी हा अनोखा असा हा पक्ष्यांसाठी उपक्रम सुरू केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात महाकाय असे उजनी धरण आहे. या ठिकाणी हजारो पक्षी शेकडो मैल प्रवास करून येतात. सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच होटगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. सोलापूरच्या आजूबाजूचे वातावरण पक्षांसाठी पोषक असल्यामुळे पक्षांचे सोलापूर हे माहेरघर आहे. लोकांमध्ये पक्षांविषयी प्रेम जागृत व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पाणपोई हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
सोलापूरचे तापमान उन्हाळ्यामध्ये सरासरी 40 अंशाच्यावर राहते. त्यामुळे पक्ष्यांना पाणी शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आपल्या घराभोवती, गॅलरीमध्ये तसेच बागेत नैसर्गिक चिवचिवाट वाढावा, म्हणून पक्ष्यांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे म्हणून खास अहमदाबादमध्ये बनवलेली ही मातीची भांडी शहरवासीयांना दिली जाणार आहेत. एकूण 5 हजार जलपात्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज एक हजार जलपात्रांचे वितरण करण्यात आले.
advertisement
या कार्यक्रमाचे शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 05, 2025 8:46 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
सोलापुरात पक्ष्यांसाठी वाटली 1 हजार मोफत जलपात्रे, माजी विद्यार्थ्यांचा अनोखा पाणपोई उपक्रम Video