Solapur News : सोलापुरात भाजप विरुद्ध भाजप, काँग्रेस-भाजप पॅनेलविरोधात देशमुखांचा संताप

Last Updated:

Solapur APMC Election : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनं भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा भडका उडवला आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप-काँग्रेस युतीविरोधात थेट दंड थोपटले आहे.

News18
News18
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर: शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनं भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा भडका उडवला आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप-काँग्रेस युतीविरोधात थेट दंड थोपटले आहे. देशमुख यांनी या युतीविरोधात स्वतंत्र पॅनल लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसरीकडे, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससोबत युती झाल्याने निवडणुकीला नवा ट्विस्ट मिळाला आहे.

भाजपमध्ये दोन गट, कार्यकर्ते संभ्रमात

माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले की,"सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजप कार्यकर्त्यांसाठी लढवली जाणार आहे. या निवडणुकीसाठी पाच ते सहा बैठका घेतल्या असून सोलापूर जिल्ह्याच्या तीनही भाजप आमदारांना आमंत्रण दिलं होते, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement

तर आनंद झाला असता...

सुभाष देशमुख यांनी म्हटले की. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी निवडणुका लढण्याचे सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कोर कमिटीमध्ये युतीचा निर्णय घेतले असेल तप त्या कोअर कमिटीत मी आहे का नाही माहिती नाही. आम्हाला माहिती देऊन जर कोअर कमिटीने निर्णय घेतला असता तर आनंद झाला असता असेही त्यांनी म्हटले.
advertisement

काँग्रेससोबत युती मान्य नाही...

भाजप पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय माझ्यावर असणार असल्याचे देशमुखांनी स्पष्ट केले. निवडणुकी संदर्भात कोअर कमिटीतून मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर ते काय बोलले मला माहिती नाही. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा स्थानिक पातळीवरील नेत्यांचा मला निरोप आला नसल्याचे त्यांनी म्हटले. माध्यमांच्या मार्फत काँग्रेससोबत युती झाल्याचे कळले. पण, भाजप काँग्रेस युती आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
आमदार कलशेट्टी हे भाजप जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांना आघाडीबाबतचा अधिकार आहे. पक्षाने जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले असतील तर त्याची माहिती नाही असे म्हणत सुभाष देशमुख यांनी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना चिमटा काढला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News : सोलापुरात भाजप विरुद्ध भाजप, काँग्रेस-भाजप पॅनेलविरोधात देशमुखांचा संताप
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement