Solapur News : सोलापुरात मोठी घडामोड, संजयमामा शिंदेंच्या महायुती पॅनलचा धुव्वा, पवार गटाची सरशी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Solapur News : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनेलचा धु्व्वा उडाला आहे.
सोलापूर: संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनेलचा धु्व्वा उडाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या संजयमामा शिंदे यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. तर विद्यमान आमदार नारायण पाटील भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून विजयी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या शिलेदाराने भाजप आमदाराच्या पॅनलचा धुव्वा उडवला. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी सहकार मंत्री आणि शरद पवारांचे शिलेदार असलेले माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम या दोघांच्याही पॅनलचा धुव्वा उडवला. त्.
advertisement
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक मंडळाच्या जागेसाठी 62 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु करण्यात आली. सुरुवातीस संस्था प्रतिनिधी गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच ऊस उत्पादक गटातील मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर महिला प्रतिनिधीसह सर्व राखीव गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गटाची एकहाती सत्ता आली आहे. तर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या महायुतीच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील 21 पैकी 21 जागांवर विजय मिळविल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करमाळा तालुक्यात जल्लोष करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या 6 महिन्यात दोन महत्त्वाच्या मोठ्या कारखान्यात शरद पवार गटाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. या निवडणुकीत प्रा. रामदास झोळ या तिसऱ्या पॅनलच्या उमेदवारांना दीड हजाराच्या वरही मतदान मिळवता आलेले नाही.
advertisement
सहकारी संस्था प्रतिनिधी गट
आ.नारायण पाटील गट: डॉ. हरीदास केवारे 218 (विजयी)
संजयमामा शिंदे गट: सुजित बागल 117
प्रा.रामदास झोळ गट : दशरथ कांबळे 05 मते मिळाली आहेत.
जेऊर ऊस उत्पादक गट
आमदार नारायण पाटील गट: श्रीमान चौधरी 8061(विजयी), महादेव पोरे 8195 (विजयी) दत्तात्रय गव्हाणे 8607(विजयी)
माजी आमदार संजयमामा शिंदे गट: चंद्रकांत सरडे 6846, प्रशांत पाटील 6897, प्रमोद बदे 6811 मते मिळाली
advertisement
प्रा. रामदास झोळ गट: रवींद्र गोडगे 820, शांतीलाल जाधव 848, दत्तात्रय कामटे 859 मते मिळाली
सालसे ऊस उत्पादक गट
आमदार नारायण पाटील गट: रविकिरण फुके 8232 (विजयी), दशरथ हजारे 7933(विजयी) आबासाहेब अंबारे 8479 (विजयी)
संजय मामा शिंदे गट: विलास जगदाळे 6805, नागनाथ चिवटे 7039, नवनाथ जगदाळे 6805
प्रा. रामदास झोळ गट : अण्णासाहेब देवकर 858, दत्तात्रय जगदाळे 882, भारत सरडे 813
advertisement
पोमलवाडी ऊस उत्पादक गट
आमदार नारायण पाटील गट : किरण कवडे 8571(विजयी), नवनाथ झोळ 8343(विजयी), संतोष पाटील 8328 (विजयी)
संजय मामा शिंदे गट दशरथ पाटील 6701, बबन जाधव 68 37,नितीन राजे भोसले 6708
प्रा. रामदास झोळ रामदास झोळ 1137, भरत जगताप 766, प्रकाश गिरंजे 765
केम ऊस उत्पादक गट
आमदार नारायण पाटील गट : दत्तात्रय देशमुख 8625(विजयी) विजयसिंह नवले 8106(विजयी) महेंद्र पाटील 8337 (विजयी)
advertisement
संजय मामा शिंदे गट : संजयमामा शिंदे 7060, सोमनाथ देशमुख 6728 सोमनाथ रोकडे 6779
प्रा.रामदास झोळ गट: सुधीर साळुंखे 824 बापूराव तळेकर 997
रावगाव ऊस उत्पादक गट
आमदार नारायण पाटील गट : डॉ अमोल घाडगे 8575(विजयी), देवानंद बागल 8092 (विजयी) अँड राहुल सावंत 8036(विजयी)
संजय मामा शिंदे गट : आशिष गायकवाड 6048, अभिजीत जाधव पाटील 7053, विनय ननवरे 6654
advertisement
प्रा.रामदास झोळ गट कल्याण पाटील 997, हरिभाऊ झिंजाडे 911, सुभाष शिंदे 784
महिला राखीव गट
आमदार नारायण पाटील गट: राधिका तळेकर 8537(विजयी),उर्मिला सरडे 8383 (विजयी)
संजय मामा शिंदे गट: मंदा सरडे 6874 शालन गुंडगिरे 7073
प्रा.रामदास झोळ गट: इंदुबाई नाईकनवरे 794 रत्नमाला मंगवडे 762.
इतर मागासवर्गीय गट
आमदार नारायण पाटील गट: दादासाहेब पाटील 9129 (विजयी)
संजय मामा शिंदे गट: रोहिदास माळी 7146
प्रा. रामदास झोळ गटाचे रवींद्र गोडगे 950
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गट
आमदार नारायण पाटील गट : राजेंद्र कदम 8806 (विजय)
संजय मामा शिंदे गट: बाळकृष्ण सोनवणे 7226
प्रा.रामदास झोळ गट: दशरथ कांबळे 1094
विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग
आमदार नारायण पाटील 9462 (विजयी )
संजय मामा शिंदे गटाचे अनिल केकान 6819
प्रा. रामदास झोळ गटाचे रायचंद खाडे 871.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 20, 2025 8:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News : सोलापुरात मोठी घडामोड, संजयमामा शिंदेंच्या महायुती पॅनलचा धुव्वा, पवार गटाची सरशी