महागड्या बाटल्या येतायेत, पोलिसांना कॉल, पुढच्या काही तासांत सूत्र फिरवली, १८ लाखांचा मुद्देमाल हाताला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
उच्च प्रतीच्या स्कॉचसह अवैध दारूच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : महागडी दारूची वाहतूक होत असल्याची टीप लागल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मध्यप्रदेश निर्मित २० बॉक्स विदेशी दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
उच्च प्रतीच्या स्कॉचसह अवैध दारूच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. मध्यप्रदेशातून होणाऱ्या अवैध मद्यतस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाच्या दोन कारवायांमध्ये तीन जणांना अटक करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एका वाहनातून मध्यप्रदेश निर्मित २० बॉक्स विदेशी दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत पुणे शहरातील कल्याणीनगर-आदर्शनगर मार्गावर एका वाहनातून उच्चप्रतीचे स्कॉचसह २८ बाटल्या जप्त करून तिघांना अटक करत सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 09, 2025 4:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महागड्या बाटल्या येतायेत, पोलिसांना कॉल, पुढच्या काही तासांत सूत्र फिरवली, १८ लाखांचा मुद्देमाल हाताला


