आमदाराच्या केबिनमधून बाहेर पडली कॉलेज तरुणी, विरोधकांनी पाहिलं अन्.., महाराष्ट्रात खळबळ उडवणारा प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. एका माजी आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा, यासाठी एका २५ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार समोर येताच महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित एफआयआर दाखल करावा, यासाठी मागील आठ दिवसांपासून एका विद्यमान आमदाराचे कार्यकर्ते या तरुणीचा पाठलाग करत होते.
पण तिने पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत घडणारा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना पश्चिम वऱ्हाड प्रांतातील एका जिल्ह्यात घडली आहे. ज्या तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव होता, त्या तरुणीला विरोधकांनी माजी आमदारांच्या केबिनमध्ये बघितलं होतं. त्यानंतर विरोधकांनी संबंधित तरुणीला गाठून, तिची माहिती काढून तिच्यावर दबाव टाकला जात होता.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या या २५ वर्षांच्या तरुणीने दिलेल्या निवेदनानुसार, काही महिन्यांपूर्वी ती नोकरीच्या संदर्भात मंत्रालयात गेली होती. तिथे तिची माजी आमदार यांच्याशी भेट झाली. नोकरीची मागणी केल्यावर त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. यानंतर ती त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी तिचे नाव विचारून तिचा संपर्क क्रमांक घेतला. या घटनेनंतर काही दिवसांनी, तेच कार्यकर्ते तिला शहरात भेटले, त्यांनी बोलायचा प्रयत्न केला. पण तिने त्यांच्याशी बोलणं टाळलं. तरीही त्यांनी सातत्याने सात ते आठ दिवस पाठलाग केला.
advertisement
खोटा गुन्हा दाखल करण्याची सक्ती
काही दिवसांनी संबंधित कार्यकर्त्यांनी एका विद्यमान आमदाराचं नाव घेऊन तरुणीवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकत वारंवार धमक्या दिल्या. यानंतर अखेर तरुणीने १ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या पीडित तरुणीने केली.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 02, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आमदाराच्या केबिनमधून बाहेर पडली कॉलेज तरुणी, विरोधकांनी पाहिलं अन्.., महाराष्ट्रात खळबळ उडवणारा प्रकार


