मेहुणीसोबत संबंध तोडायला सांगत होता, मात्र तो... कोल्हापूरच्या सुहास मर्डर प्रकरणाला वेगळं वळण

Last Updated:

दरम्यान सुहास थोरात खून प्रकरणी पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18
News18
कोल्हापूर : दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्याने सुहास सतीश थोरात (19, रा. भोने माळ, इचलकरंजी) या युवकाचे
अपहरण करून कागल तालुक्यातील अर्जुनी येथील देवचंद कॉलेजच्या मागील भागात त्याचा खून केला आणि मृतदेह तिथेच ओढ्यात टाकल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच संशयि ओंकार अमर शिंदे (25), ओंकार रमेश कुंभार (21, दोघे रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) व एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेहुणीशी प्रेमसंबंध असल्याचा राग धरून सुहासचा खून केला असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, सुहासचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची पोलीस तपासात प्राथमिक माहिती होती. हाच धागा धरत पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता. तपासादरम्यान सुहासचे मेहुणीशी असलेले प्रेमसंबंध समोर आले. हे प्रेमसंबंध खुनामागील मुख्य कारण असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. आता पोलीस याच दिशेने तपास करत आहेत.
advertisement

वर्षभरापूर्वी झाला होता वाद

वर्षभरापूर्वी सुहास आणि ओंकार शिंदे यांच्यात वाद झाला असल्याचे समोर आले आहे. जेव्हा शिंदेने सुहासला चाकू लावून धमकी दिली होती. मात्र आता तपासात सुहासचे मेहुणीशी प्रेमसंबंध असल्याचा राग हे कारण समोर आले आहे. तरी प्रकरणाचा तपास वेगाने होत असून आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.
advertisement

कसा अडकला सुहास जाळ्यात?

सुहास एका गाडीच्या शोरूममध्ये कामाला होता. तो कामावरून घरी जेवायला आला असता आरोपींनी त्याला गाडी दुरुस्तीच्या बहाण्याने लिगाडे मळा परिसरातून घेऊन निपाणी जवळील देवचंद कॉलेजकडे नेले. तेथे कोयत्याने शरीरावर सात-आठ वार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह जवळच्या ओढ्यात फेकला. बराच वेळ घराबाहेर गेलेला सुहास परत न आल्याने वडिलांनी चौकशी सुरू केली. मात्र कोणतीही माहिती मिळत नसल्याने लगेच त्याच्या अपहरणाची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत दाखल केली होती.
advertisement

अल्पवयीन मुलाचा देखील समावेश

सुहासच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही, मोबाइल लोकेशन, शस्त्र जप्ती आणि घटनास्थळ पंचनामा केला आहे. अपहरण, खून आणि ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले असून अल्पवयीन आरोपी हा सुहासचा मित्र तसेच दहावीचा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मेहुणीसोबत संबंध तोडायला सांगत होता, मात्र तो... कोल्हापूरच्या सुहास मर्डर प्रकरणाला वेगळं वळण
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement