व्हॅलेंटाईनआधी प्रेमीयुगुलाचा धक्कादायक शेवट; अल्पवयीन मुलगी अन् तरुण 15 दिवस होते बेपत्ता
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर एक दिवस तिचा शोध घेतला. पण ती न सापडल्याने तळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.
नरेंद्र मते, वर्धा : वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील पारडी इथल्या प्रेमी युगलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. पारडी येथील प्रेमीयुगलाने काही दिवसापूर्वी पलायन केले होते. ३ फेब्रुवारी रोजी त्या दोघांचेही मृतदेह एका विहिरीत आढळून आले. यातील मृत मुलाचे नाव हर्षल बाबाराव वाघाडे (वय २२) असे आहे, मृतक मुलगी अल्पवयीन आहे. शेतातील विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतदेहांची ओळख झाली. तळेगाव पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी पारडी येथील एका तरुणासोबत पळून गेली होती. दोघांचाही गेल्या पंधरा दिवसांपासून शोध सुरू होता. मात्र त्यांचे मृतदेह कुसूमदोडा शेतशिवारातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडले. दोघांनीही एकमेकांना ओढणीने घट्ट बांधून विहिरीत उडी मारल्याचं प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी म्हटलं आहे. तरुणाचे नाव हर्षल बाबा वाघाडे असं आहे. त्याच्यासोबत पळून गेलेली मुलगी अल्पवयीन आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.
advertisement
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर एक दिवस तिचा शोध घेतला. पण ती न सापडल्याने तळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दोघांचे मृतदेह एका विहीरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. मृतदेह कुजलेले असल्याने शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2024 10:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
व्हॅलेंटाईनआधी प्रेमीयुगुलाचा धक्कादायक शेवट; अल्पवयीन मुलगी अन् तरुण 15 दिवस होते बेपत्ता


