यवतमाळच्या ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेची चाके का थांबली? काय आहे इतिहास पाहा Video

Last Updated:

एकेकाळी दिन दुबळ्या जनतेची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला एक्सप्रेसची चाके सध्या काही कारणांनी थांबलेली आहेत.

+
News18

News18

अमिता शिंदे , प्रतिनिधी
यवतमाळ, 28 डिसेंबर : पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. याजिल्ह्यात यवतमाळ ते मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेचा प्रवास 25 डिसेंबर 1903 ला सुरु झाला. पांढऱ्या सोन्याची म्हणजेच कापसाची निर्यात करण्यासाठी शकुंतला रेल्वे धावू लागली. त्यानंतर 1952 मध्ये ब्रिटिशांचा भारतातील रेल्वेचा करार संपला मात्र तिथून पुढे बरेच वर्ष केवळ यवतमाळची शकुंतलाच ब्रिटिशांच्या ताब्यात होती. पण एकेकाळी दिन दुबळ्या जनतेची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला एक्सप्रेसची चाके सध्या काही कारणांनी थांबलेली आहेत.
advertisement
इतकंच नाही तर शकुंतला रेल्वेचे ट्रॅक सध्या दयनीय अवस्थेत आहेत. ऐतिहासिक रेल्वेची अशी अवस्था बघून शकुंतला सत्याग्रह समितीच्या वतीने रेल्वे वाचवण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. शकुंतला रेल्वेचा इतिहास काय आहे? आणि शकुंतला सत्याग्रह समितीची काय मागणी आहे यासंदर्भात शकुंतला रेल्वेचे अभ्यासक विजय विल्हेकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
या ब्रिटिशकालीन रेल्वेला शकुंतला हे नाव कसं पडलं?
ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेला 25 डिसेंबर 1903 ला यवतमाळ ते मूर्तिजापूर सुरुवात झाली. स्वातंत्र्य सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतला बाईंच्या नावावरून या रेल्वेला शकुंतला असं नाव पडलं आहे. शकुंतला बाईंचे वडील रेल्वेमध्ये अधिकारी होते. शकुंतला बाईंच्या नावाने सुरू झालेल्या रेल्वेची अवस्था बघून ही रेल्वे लवकरात लवकर सुरू व्हावी आणि ऐतिहासिक वारसा कायम राहावा जपला जावा यासाठी शकुंतलेला वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या नागरिकांकडून शकुंतला पुन्हा सुरू करण्याची मागणी रेटून धरली जात आहे. मात्र भविष्यात ही ऐतिहासिक ब्रिटिशकालीन रेल्वे कधी सुरू होते याकडेच सर्वजण उत्सुकतेने बघत आहेत.
advertisement
काय आहे मागणी?
शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या वतीने 2011 सालापासून सत्याग्रह सातत्याने सुरू आहे. हा प्रश्न अत्यावश्यक आहे. कारण ही रेल्वे शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दुर्बल घटकांसाठी हे अत्यंत महत्त्वाची रेल्वे आहे. मेळघाटातील आदिवासींसाठी ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सर्व सुविधांनी युक्त करून ही रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी केल्या 2011 पासून करण्यात येत आहे. आता जेमतेम ब्रॉडगेजच्या बाता सुरू आहेत, ब्रॉडगेजचा सर्वे सुरू आहे असेही ऐकण्यात येत आहे. शकुंतला रेल्वे ही सुरळीत सुरू असताना अचानक अगदी किरकोळ कारणासाठी बंद केली गेली. ती तातडीने सुरू करण्यात यावी अशी सर्वसामान्यांची आणि शकुंतला रेल्वे बचाव समितीची मागणी असल्याचं विजय विल्हेकर यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
यवतमाळच्या ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेची चाके का थांबली? काय आहे इतिहास पाहा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement