Santosh Deshmukh Case : 126 दिवस उलटले पण कृष्णा आंधळे सापडेना, अखेर SIT ने घेतला मोठा निर्णय!

Last Updated:

Santosh Deshmukh Murder case Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा गेल्या 126 दिवसांपासून फरार आहे.

Krishna Andhale SIT add 2 officers
Krishna Andhale SIT add 2 officers
Krishna Andhale In Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली होती. मात्र, कृष्णा आंधळे याचा थांगपत्ता अद्याप कोणाला सापडला नाही. अशातच आता आरोपी कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले असले तरी अजूनही त्याला शोध लागला नाही. अशातच आता एसआयटीने मोठा निर्णय घेतला आहे.

गृहविभागाने काढले आदेश

संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी एसआयटी पथकात नवे दोन कर्मचारी वाढवले आहेत. कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आंधळे च्या शोधासाठी केज मधील स्थानिक कर्मचारी पथकात समाविष्ट आहे, याबाबत गृहविभागाने आदेश काढले आहेत. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या महासंचालकांनी या पथकात एक पोलिस हवलदार आणि एक पोलीस नाईक याची नियुक्ती करण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर आता पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अनिल मंदे यांचा एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
advertisement

कृष्णा आंधळे कोण?

कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केलेले आहेत. त्याच्या घरी गरीबी आहे. पत्र्याचं घर आहे. त्याला फारसं काही घराबद्दल, आई वडिलांबद्दल ओढ नाही. तो अनेक दिवस संपर्कविना राहतो असा त्याची पार्श्वभूमी आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली होती. कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात, दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वैगरे अशा ठिकाणी गेला आहे का? याचा तपास सुरु आहे. तो सध्या फरार आहे. कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे, हा आरोपी आहे, असं सुरेश धस म्हणाले होते.
advertisement
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे. मात्र, कृष्णा आंधळे कधी सापडणार? असा प्रश्न कायम राहिल्याचं पहायला मिळतंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case : 126 दिवस उलटले पण कृष्णा आंधळे सापडेना, अखेर SIT ने घेतला मोठा निर्णय!
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement