बीडच्या डिपार्टमेंटमध्ये पोलीस नेमप्लेटवर आडनाव का लिहित नाही? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं कारण
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बीडच्या प्रशासनातील नियुक्तीचा एक नवा पॅटर्न उजेडात आला होता आता त्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने देखील यावर वक्तव्य केले आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीसह एका विशिष्ट प्रवर्गाची मक्तेदारी चव्हाट्यावर आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा अधोरेखित केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी परळी येथील सर्वच प्रमुख अधिकारी एकाच जातीचे असल्याचे ठासून सांगितले होते. त्यामुळे बीडच्या प्रशासनातील नियुक्तीचा एक नवा पॅटर्न उजेडात आला होता आता त्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने देखील यावर वक्तव्य केले आहे.
भेदभावाच्या स्वार्थातून बीड जिल्ह्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये कोणीही पोलीस आपल्या नेमप्लेटवर आडनाव लिहित नव्हते, कारण तो कोणत्या जातीचा आहे हे कळायचे, असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
तसेच यापुढे माणसं शरीराने आणि मनाने निरोगी कशी राहतील आणि माणसांमध्ये समानता कशी निर्माण होईल,याचा देखील प्रयत्न करायला पाहिजे,असं मत देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
advertisement
अंजली दमानिया काय म्हणाल्या होत्या?
अंजली दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या की, वंजारी समाजात भगवान बाबांसारखे विचारवंत होते, ज्यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधला. त्यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा दुरुपयोग करून काही राजकीय नेते आणि वाल्मिक कराड सारखी माणसे, या समाजाला बदनाम करत आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणसे परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. माझा आक्षेप ह्यावर नक्कीच आहे. सगळ्या वंजारी समाजातील लोकांनी यासंबंधी जागे व्हायला हवे, ही माणसे फक्त समाजाचा वापर करत आहेत, हे समजून घ्यायला हवे. हा मुद्दा समजवण्यासाठी मी पूर्ण यादी देत आहे. शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 01, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडच्या डिपार्टमेंटमध्ये पोलीस नेमप्लेटवर आडनाव का लिहित नाही? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं कारण


