यवतमाळ: पत्नीचा विरह सहन न झाल्यानं पतीनं 48 तासांत सोडला जीव, मनाला चटका लावणारी घटना

Last Updated:

डेहाणी गावात शेख जानी शेख निजामोद्दीन यांनी पत्नी मरियम बानोच्या निधनानंतर 48 तासात प्राण सोडले. या घटनेमुळे संपूर्ण गाव आणि कुटुंब शोकाकुल झाले.

News18
News18
५० वर्षांच्या सुखी संसाराला कुणीची नजर लागली असं कुटुंबातले म्हणत आहेत. अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीचा विरह सहन न झाल्याने पतीनंही 48 तासात आपला जीव सोडला. मनाला चटका लावणारी ही धक्कादायक घटना यवतमाळच्या डेहाणी गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली. खरं आणि निस्सीम प्रेम काय असतं हे पुन्हा एकदा संपूर्ण गावानं पाहिलं.
पत्नीच्या निधनाचा धक्का पतीला सहन झाला नाही. याच विरहात त्याने 2 दिवसात आपले प्राण सोडले. शेख जानी शेख निजामोद्दीन यांनी वयाच्या 74 व्या वर्षी प्राणत्याग केला. शेख जानी शेख निजामोद्दीन हे 10 वर्षांपूर्वी जेहणी वन विभागातून चौकीदार पदावरुन निवृत्त झाले होते. निवृत्ती वेतनाच्या आधारावर त्यांचं कुटुंब चालत होतं. सुखीसंसार सुरू होता.
advertisement
पाच वर्षांपासून पत्नी मरियम बानो अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त होती. 6 डिसेंबर रोजी मरियम बानो यांचं आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पत्नीच्या निधनाने शेख अत्यंत अस्वस्थ झाले. मानसिक धक्का बसला आणि विहर सहन न झाल्याने अखेर त्यांनी आपले प्राण सोडले.
8 डिसेंबर रोजी त्यांची तब्येत बिघडली, प्रकृती जास्त खालावायला लागली. उलट्या आणि चक्क येऊ लागली. कुटुंबियांनी त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांनी प्राण सोडले होते. शेख यांच्या पश्चात त्यांच्या दोन विवाहित मुली, सुना नातवंड असं कुटुंब आहे. नुकतीच विवाह होऊन सासरी गेलेल्या मुलीसाठी तर हा मोठा मनसिक धक्का आहे.
advertisement
आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद होणं, डिवोर्सपर्यंत जाणं अशा घटना घडतात, मात्र पत्नीचा विरह सहन न झाल्याने 48 तासांत जीव सोडल्याच्या या घटनेनं संपूर्ण गाव हळहळलं. सात जन्म सोबत राहण्याचं वचन घेतलं, आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन घेतलं आणि ते वचन शेवटच्या क्षणी देखील पतीनं पूर्ण केलं. पत्नीपाठोपाठ दोन दिवसांत पतीनेही आपला जीव सोडला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
यवतमाळ: पत्नीचा विरह सहन न झाल्यानं पतीनं 48 तासांत सोडला जीव, मनाला चटका लावणारी घटना
Next Article
advertisement
Maharashtra Winter Session: भाजपच्या गुगलीने मविआची विकेट पडणार? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं
भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं
  • भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं

  • भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं

  • भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं

View All
advertisement