Malad Fraud: आधी चांदीचं नाणं दाखवलं नंतर किलोभर सोनं, सिनेमालाही लाजवेल असं व्यापाऱ्याला लुटलं!

Last Updated:

Mumbai Malad News: स्वस्त दरात सोनं खरेदी करण मुंबईतील भांडीविक्रेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. नाशिक मध्ये केलेल्या खोदकामात मिळालेले पुरातन सोने खरेदी करणे मालाडमधील एका भांडी विक्रेत्याला चांगलेच महागात पडले आहे.

Malad Fraud: आधी चांदीचं नाणं दाखवलं नंतर किलोभर सोनं, सिनेमालाही लाजवेल असं व्यापाऱ्याला लुटलं!
Malad Fraud: आधी चांदीचं नाणं दाखवलं नंतर किलोभर सोनं, सिनेमालाही लाजवेल असं व्यापाऱ्याला लुटलं!
सध्या सोनं प्रति तोळा 1 लाख 30 हजार 925 रुपये आहे. सोन्याचा भाव गगनाला भिडले असताना स्वस्त दरात सोनं खरेदी करण मुंबईतील भांडीविक्रेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. नाशिक मध्ये केलेल्या खोदकामात मिळालेले पुरातन सोने खरेदी करणे मालाडमधील एका भांडी विक्रेत्याला चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे त्याला तब्बल 25 लाखांचा भुर्दंड बसला आहे. याप्रकरणी भांडी विक्रेत्याने पोलिस स्थानकात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
मालाडच्या भांडी विक्रेत्याकडे भांडी खरेदीसाठी नियमित येणाऱ्या व्यक्तीने नाशिक येथे खोदकामात सुमारे एक किलोच्या बोरमाळा स्वस्तात देण्याच्या बहाण्याने भांडी विक्रेत्याकडून 25 लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात या बोरमाळा तपासल्या असता, त्या सोन्याच्या नसून, तांब्याच्या असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाडच्या भांडी विक्रेत्याकडे मोहन उर्फ सिरोही काका नावाची व्यक्ती आली. त्याने त्या भांडी विक्रेत्यासोबत मारवडी भाषेत संभाषण करून तीन स्टीलचे ग्लास खरेदी केले. भांडी विक्रेत्याने त्याला तू राजस्थानचा आहे का? असा प्रश्न विचारला.
advertisement
तर, त्या गिऱ्हाईकाने राजस्थानच्या सिरोही येथील असल्याचे सांगत ग्लास घेऊन निघून गेला. तो पुन्हा दोन दिवसांनंतर दुकानात आला. त्यावेळी त्याने दोन स्टीलच्या वाट्या खरेदी केल्या. खरेदी करताना त्या गिऱ्हाईकाने भांडी विक्रेत्याला एक चांदीचं नाणं दाखवलं. नाशिकमध्ये खोदकाम करताना हे नाणं सापडल्याचं त्याला सांगितलं. तो गिऱ्हाईक पुन्हा तिसऱ्यांदा भांडी विक्रेत्याच्या दुकानात आला. तेव्हा त्याच्यासोबत एक तरूण सुद्धा होता. तो त्याचा भाचा होता, त्याने त्याची ओळख त्या दुकानदारासोबतही करून दिली. त्या गिऱ्हाईकासोबत त्यावेळी एक सोन्याची बोरमाळ होती. त्यातले दोन मणी काढून त्याने भांडी विक्रेत्याला त्याची तपासणी करण्यासाठी दिले.
advertisement
बोरमाळीतले मणी भांडीविक्रेत्याला तपासायला सांगितले असता, ते मणी खरे असल्याचे स्पष्ट झाले. भांडी विक्रेत्याचा विश्वास बसल्याचे पाहून त्या गिऱ्हाईकाने सुमारे एक किलो वजनाच्या अनेक बोरमाळा स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले. सध्या सोन्याचे दर पाहता स्वस्तात सोने मिळत असल्याचे पाहून व्यापाऱ्याने खरेदी करण्याची तयारी दर्शवली. एक किलो वजन असलेल्या या बोरमाळा 25 लाखांना घेण्याची तयारी भांडीविक्रेत्याने दर्शवली. बोरमाळीचे पैसे घेऊन त्या गिऱ्हाईकाने भांडे विक्रेत्याला नॅशनल पार्कजवळ बोलवले.
advertisement
सांगितलेल्या ठिकाणी भांडी विक्रेता पोहोचल्यानंतर पत्नी एका कॉम्प्लेक्स जवळ सोने घेऊन उभी असल्याचे सांगत तो गिऱ्हाईक भांडीविक्रेत्याला रिक्षाने घेऊन गेला.
या ठिकाणी 25 लाख देऊन भांडी विक्रेत्याने सोन्याच्या बोरमाळा घेतल्या. दुसऱ्या दिवशी या माळा त्या भांडी विक्रेत्याने सोनाराकडे दिल्या, त्यावेळी यात सोने नसून तांबे आणि निकेल धातु असल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, भांडी विक्रेत्याने मोहनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद येत होता. खोटे सोने देऊन 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात भांडीविक्रेत्याने गुन्हा दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Malad Fraud: आधी चांदीचं नाणं दाखवलं नंतर किलोभर सोनं, सिनेमालाही लाजवेल असं व्यापाऱ्याला लुटलं!
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement