मुंबईत पुष्पा स्टाइलनं स्मगलिंग! १५ कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याची तस्करी, पोलिसांकडून कारवाई
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईत DRI च्या 'ऑपरेशन बुलियन ब्लेझ'मध्ये ११.८८ किलोग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त, ११ आरोपी अटकेत. दोन बेकायदेशीर युनिट्स आणि दुकानांवर छापे, अवैध बाजाराला धक्का.
पुष्पा' चित्रपटात दाखवलेल्या हटके आणि अत्यंत गुप्तपणे केलेल्या तस्करीच्या पद्धतीची आठवण करून देणारी एक मोठी घटना मुंबईत घडली. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 'ऑपरेशन बुलियन ब्लेझ' यशस्वी करत, मुंबईत चालणाऱ्या एका सोने-चांदी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अधिकाऱ्यांनी तब्बल ११.८८ किलोग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त केले आहे, ज्याची किंमत १५ कोटींहून अधिक आहे.
मुख्य सूत्रधारासह एकूण ११ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने, दोन बेकायदेशीर सोने वितळवण्याचे युनिट्स आणि नोंदणी नसलेल्या दुकानांमधून हे रॅकेट चालवले जात होते. या कारवाईमुळे मुंबईतील अवैध सोने बाजाराला जोरदार धक्का बसला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, डी.आर.आय. च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील दोन बेकायदेशीर सोने वितळवण्याचे युनिट्स आणि दोन नोंदणी नसलेल्या दुकानांवर छापे टाकले. या धाडसत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचा साठा हस्तगत करण्यात आला. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ११ आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे, ज्यात या संपूर्ण सिंडिकेटच्या मुख्य सूत्रधाराचाही समावेश आहे.
advertisement

डी.आर.आय. ने दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट अत्यंत संघटित पद्धतीने चालवले जात होते. यामध्ये मुख्य सूत्रधारासोबत त्याचे कुटुंबीय, सोने वितळवणारे कारागीर, हिशेबनीस आणि डिलिव्हरी करणारे लोक यांचा समावेश होता. या सिंडिकेटच्या माध्यमातून सोने आणि चांदीची बेकायदेशीर तस्करी आणि त्यानंतर ते वितळवून त्याची विक्री केली जात होती. डी.आर.आय. ने जप्त केलेले सोन्या-चांदीचे प्रमाण आणि त्याचे मूल्य पाहता, हे रॅकेट किती मोठ्या स्तरावर कार्यरत होते, याचा अंदाज आहे. या कारवाईमुळे मुंबईतील अवैध सोने बाजाराला मोठा धक्का बसला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत पुष्पा स्टाइलनं स्मगलिंग! १५ कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याची तस्करी, पोलिसांकडून कारवाई


