Kurla Fire: मुंबईत पुन्हा हॉटेलमध्ये अग्नितांडव, कुर्ल्यातील घटनास्थळाचा पहिला VIDEO

Last Updated:

कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल बी एस रोड वरील हॉटेल सन लाईटला आग लागल्याची घटना बुधवारी घडली आहे. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Kurla Fire: मुंबईत पुन्हा हॉटेलमध्ये अग्नितांडव, कुर्ल्यातील घटनास्थळाचा पहिला VIDEO
Kurla Fire: मुंबईत पुन्हा हॉटेलमध्ये अग्नितांडव, कुर्ल्यातील घटनास्थळाचा पहिला VIDEO
कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल बी एस रोड वरील हॉटेल सन लाईटला आग लागल्याची घटना बुधवारी घडली आहे. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे परिसरामध्ये नागरिकांची धावपळ होताना दिसत आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी हॉटेल आल्यामुळे हॉटेलचे नुकसान झाले आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर धावपळ होताना दिसत आहे.
कुर्ला (पश्चिम) येथील एलबीएस रोड लगत असलेल्या हॉटेल सनलाईटला आग लागली आहे. नेमकं हॉटेलला कशी काय आग लागली ? याचं कारण अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. पोलिस पथकासह अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमध्ये कोणीही जखमी झाले नसले तरीही मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. आग लागताच तात्काळ परिसरातील नागरिकांनी आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी सिलेंडर वैगेरे सुरक्षित स्थळी हलवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
advertisement
आगीमुळे हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीमध्ये किती वित्तहानी झालेली आहे, याची माहिती समोर आलेली नाही. हॉटेलच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांना आणि घरांना देखील कोणतीही हानी पोहोचलेली नाही. आगीमुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण होते. धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू होती. आग लागली तेव्हा काही काळ परिसरामध्ये धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. गाडी चालकांनी त्या धुरातून सुद्धा हळूहळू मार्ग काढत पुढे सरकत होते. आग नियंत्रणात आली असून सध्या अग्निशमन दल हॉटेलमध्ये कूलिंग ऑपरेशन राबवत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Kurla Fire: मुंबईत पुन्हा हॉटेलमध्ये अग्नितांडव, कुर्ल्यातील घटनास्थळाचा पहिला VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement