Kharkopar- Uran Railway: खारकोपर- उरण दरम्यानची रेल्वे लोकलसेवा बंद, नेमकं कारण काय?

Last Updated:

Kharkopar- Uran Railway Shutdown: खारकोपर उरणदरम्यानची लोकलसेवा बंद झाली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची लोकलसेवा बंद झाली आहे. पेट्रोलची पाईपलाईन फुटल्याने ही लोकलसेवा बंद झाल्याची माहिती मिळाली आहे.

Kharkopar- Uran Railway Stop: खारकोपर- उरण दरम्यानची रेल्वे लोकलसेवा बंद, नेमकं कारण काय?
Kharkopar- Uran Railway Stop: खारकोपर- उरण दरम्यानची रेल्वे लोकलसेवा बंद, नेमकं कारण काय?
ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील खारकोपर ते उरण या स्थानकादरम्यानची रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. यामुळे ऐन दुपारच्या वेळेत नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. खारकोपर- उरण रेल्वे मार्गावर रेल्वेची संख्या तुलनेने फार कमी आहे, पण असं असलं तरीही प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खारकोपर- उरण मार्गावरील लोकलसेवा बंद झाली आहे.
आज दुपारच्या सुमारास ट्रान्स हार्बरवरील खारकोपर उरणदरम्यानची लोकलसेवा बंद झाली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची लोकलसेवा बंद झाली आहे. पेट्रोलची पाईपलाईन फुटल्यामुळे ही लोकलसेवा बंद झाल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. कोणताही अपरिचीत घटना घडण्यापूर्वीच मध्य रेल्वेने खबरदारी म्हणून रेल्वे सेवा बंद केली आहे. शिवाय, मध्य रेल्वेने प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
किती वेळामध्ये पाईपलाईन दुरूस्तीसाठी वेळ लागेल, याची माहिती कळू शकलेली नाही. रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर त्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचं काम सध्या सुरू आहे. खारकोपर- उरण मार्गावर पेट्रोलची पाईपलाईन फुटल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आणखी किती वेळात ही रेल्वे सेवा पुर्ववत होणार ? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बरच्या तुलनेत सीवूड बेलापूर- उरण मार्गावर लोकल फेऱ्या अत्यंत कमी आहेत. उरण मार्गावर प्रवासी संख्या वाढत असतानाही, लोकल फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाहीत. उरण मार्गावर दीड तासाच्या अंतराने लोकल उपलब्ध आहे. यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.
advertisement
लवकरच रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Kharkopar- Uran Railway: खारकोपर- उरण दरम्यानची रेल्वे लोकलसेवा बंद, नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement