Ranichi Baug : राणी बागेत पर्यटकांची रेलचेल वाढणार; 16 नवीन परदेशी पाहुण्यांचे आगमन, यादी आली समोर
Last Updated:
Mumbai Rani Baug : मुंबईच्या राणीबागेत अनेक विदेशी प्राणी पाहायला मिळणार आहेत. नव्या एक्झॉटिक झोनमध्ये 17 पिंजरे, आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक अधिवास तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे.
मुंबई : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीबाग आता नव्या रूपात पर्यटकांसमोर येणार आहे. इथे येत्या काळात झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, ईमू अशा अनेक परदेशी प्राण्यांचे दर्शन होणार आहे. या नवीन एक्झॉटिक झोनसाठी पालिकेकडून सुमारे 17 नवीन अधिवास आणि पिंजरे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पर्यटकांसाठी मेगा सरप्राईज
राणीबागेला लागून असलेल्या मफतलाल मिलची अंदाजे 10 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आल्याने विस्तारीकरणाला आणखी वेग मिळाला आहे. याच जागेवर आधुनिक सुविधा, प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरणाशी जुळणारी संरचना आणि पर्यटकांसाठी अधिक सोयी निर्माण करण्याचे नियोजन केले जात आहे. प्राण्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र निवास, आरोग्य सुविधा, विशेष आहार व्यवस्था यांचाही समावेश असेल.
advertisement
नवीन झोनमध्ये पर्यटकांसाठी दोन मजली चीता थीम रेस्टॉरंट, स्वच्छ शौचालये, वॉकवे, बोर्डवॉक, कम्पाउंड वॉल आणि सुंदर लँडस्केपिंग उभारले जाणार आहे. काही प्रदर्शनांमध्ये नैसर्गिक खडक, जलाशय आणि जंगलासारखे वातावरण निर्माण केले जाईल. शिवाय काही ठिकाणी पाण्याखालून प्राण्यांचे निरीक्षण करता येईल अशी अत्याधुनिक सुविधा देखील करण्यात येणार आहे.
कोणते असतील नवे प्राणी
या एक्झॉटिक झोनमध्ये ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील विविध प्राणी संस्कृतींवर आधारित थीम विभाग असतील. यामध्ये ईमू, वॉलेबी, ब्लॅक स्वान, लोरिकीट, कासव, जॅग्वार, प्यूमा, गोरिला, टॅमरिन, मार्मोसेट, पांढरे सिंह, रिंग-टेल्ड लेमुर, जिराफ-झेब्रा-ओरिक्स, जायंट अँटीटर, भीराकेट, चीता आणि हिप्पो अशा दुर्मीळ प्राण्यांचा समावेश आहे.
advertisement
माकडांसाठी विशेष जिमनेजियम स्वरूपाची संरचनाही उभारली जाणार आहे. पक्ष्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी वेगळे आवार असेल. या सर्व प्रयत्नांमुळे राणीबाग पर्यटकांसाठी शैक्षणिक, मनोरंजक आणि रोमांचक अनुभव देणारे ठिकाण ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ranichi Baug : राणी बागेत पर्यटकांची रेलचेल वाढणार; 16 नवीन परदेशी पाहुण्यांचे आगमन, यादी आली समोर


