Mumbai News : गळ्यात होती फक्त एक वस्तू... आणि अपघातानंतर आजीचा पत्ता लागला! नेमकं कस ठरलं तंत्रज्ञान तारणहार

Last Updated:

Mumbai News : सध्या सर्वत्र होत असलेली घटना सर्वांना आश्चर्यात पाडत आहे. जिथे एका वृद्ध महिलेची माहिती तिच्या कुटुंबियांना जीपीएस द्वारे समजली आहे. नेमकं काय घडलं होतं ते सविस्तर जाणून घ्या.

News18
News18
मुंबई : मुंबईतील शिवडी परिसरात राहणाऱ्या 79 वर्षीय सायरा बी यांच्यासाठी तंत्रज्ञान अक्षरशहा जीवनदान ठरलं आहे. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, अपघात कधी झाला आणि तंत्रज्ञानामुळे त्यांची सुटका कशी झाली हे सर्व जाणून घ्या.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,3 डिसेंबरला यरा बी त्या दिवशी आपल्या जुन्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. गेल्या मात्र रस्त्यातून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनचालकांनी त्यांना जोरदार धडक दिली.या अपघातात त्यांच्या डोक्याला, पायाला, छातीला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. त्या वेदनांनी तडफडत असताना एका व्यक्तीने त्यांना आपल्या टॅक्सीतून केईएम रुग्णालयात नेले.
advertisement
महिला परतली नसल्याने घरचे काळजीत
वृद्ध महिला घराबाहेर चालण्यासाठी गेली होती तरी बराच वेळ परतल्या नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वजण चिंतेत आले. पण ही चिंता काही वेळा पूर्तीत राहिली कारण या वृद्ध महिलेच्या नातवाने त्यांच्या गळ्यात काही दिवसांपूर्वी एक लहानस'GPS' डिव्हाइस बसवलं होतं. याचं मुख्य कारण म्हणजे या महिलेची स्मरणशक्ती कमी होती. ,त्यामुशे लोकेशन तपासलं असता आजी केईएम रुग्णालयात असल्याचं समजलं आणि घरातले लगेच तिथं पोहचले.
advertisement
कुटुंबिय रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि मग अधिक चांगल्या उपचारासाठी दादीला जेजे रुग्णालयात हलवलं. तिथे तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या कमरेला फ्रॅक्चर आणि आंतरिक जखमा असल्याचे सांगितले.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर महिलेच्या नातवाने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तात्काळ अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेत GPS डिव्हाइसच्या मदतीने वेळेत मिळालेली माहिती जीव वाचवणारी ठरली. वयोवृद्धांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञान किती उपयोगी ठरू शकतं, याचं हे उत्तम उदाहरण ठरलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : गळ्यात होती फक्त एक वस्तू... आणि अपघातानंतर आजीचा पत्ता लागला! नेमकं कस ठरलं तंत्रज्ञान तारणहार
Next Article
advertisement
Pune News : साडे चार तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर आरोपांचा बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळबळ
४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब
  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

View All
advertisement