Mumbai Local: 6 डिसेंबरला मुंबईला येण्यासाठी धावणार 12 विशेष लोकल, मध्य रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अर्थात 6 डिसेंबरच्या दिवशी मुंबई उपनगरांतून दादरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अर्थात 6 डिसेंबरच्या दिवशी मुंबई उपनगरांतून दादरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 6 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ- कल्याण आणि कुर्ला- वाशी/ पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या वेळांमध्ये या लोकल चालवल्या जाणार आहेत. जाणून घेऊया...
5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री दादरकरिता प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष सोय मध्य रेल्वेने केली आहे. अनेक भीम अनुयायी 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभुमीवर दाखल होतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेचे मुंबई मंडळ विशेष रेल्वे सोडणार आहे. जेणेकरून प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल. उपनगरीय विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. अर्थात धीम्या मार्गावर या लोकल चालवल्या जाणार आहेत.
advertisement
5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री दादर स्थानकाकरिता मध्यरात्री परळ- कल्याण आणि कुर्ला- वाशी/ पनवेल मार्गावर 12 अतिरिक्त विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. कुर्ला- परळ ही विशेष लोकल, कुर्ला स्थानकावरून मध्यरात्री 12.45 वाजता सुटेल आणि परळ स्थानकावर 01.05 मिनिटांनी पोहोचेल. कल्याण- परळ ही विशेष लोकल, कल्याण स्थानकावरून 01.00 वाजता सुटेल आणि परळ स्थानकावर 02.20 वाजता पोहोचेल. ठाणे- परळ ही विशेष लोकल, ठाणे स्थानकावरून 02.10 वाजता सुटेल आणि परळ स्थानकावर 02.55 मिनिटांनी पोहोचेल.
advertisement
परळ- ठाणे ही विशेष लोकल, परळ स्थानकावरून मध्यरात्री 01.15 वाजता सुटेल आणि ठाणे स्थानकावर मध्यरात्री 01.55 वाजता पोहोचेल. परळ- कल्याण ही विशेष लोकल, परळ स्थानकावरून मध्यरात्री 02.30 वाजता सुटेल आणि कल्याण स्थानकावर 03.50 वाजता पोहोचेल. परळ- कुर्ला परळ स्थानकावरून 03.05 वाजता सुटेल आणि कुर्ला स्थानकावर 03.20 वाजता पोहोचेल. विशेष लोकल फक्त मध्य रेल्वेवरच नाही तर, हार्बर रेल्वे मार्गावरही चालवली जाणार आहे. कुर्ला ते वाशी- पनवेल मार्गावर ही विशेष लोकल चालवली जाणार आहे.
advertisement
कुर्ला ते वाशी- पनवेल मार्गावर डाऊन- अप दोन्हीही बाजूंनी विशेष गाड्या धावणार
view commentsवाशी- कुर्ला ही विशेष लोकल, वाशी स्थानकावरून मध्यरात्री 01.30 वाजता सुटेल आणि कुर्ला स्थानकावर मध्यरात्री 02.10 वाजता पोहोचेल. पनवेल- कुर्ला ही विशेष लोकल, पनवेल स्थानकावरून मध्यरात्री 01.40 वाजता सुटेल आणि कुर्ला स्थानकावर मध्यरात्री 02.45 वाजता पोहोचेल. वाशी- कुर्ला ही विशेष लोकल, वाशी स्थानकावरून मध्यरात्री 03.10 वाजता सुटेल आणि कुर्ला स्थानकावर मध्यरात्री 03.40 वाजता पोहोचेल. तर, डाऊन मार्गासाठी, कुर्ला- वाशी ही विशेष लोकल, कुर्ला स्थानकावरून मध्यरात्री 02.30 वाजता सुटेल आणि वाशी स्थानकावर मध्यरात्री 03 वाजता पोहोचेल. कुर्ला – पनवेल ही विशेष लोकल, कुर्ला स्थानकावरून मध्यरात्री 03 वाजता सुटेल आणि पनवेल स्थानकावर मध्यरात्री 04 वाजता पोहोचेल. कुर्ला – वाशी ही विशेष लोकल, कुर्ला येथून 04 वाजता सुटेल आणि वाशी स्थानकावर मध्यरात्री 04.35 वाजता पोहोचेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 6:05 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: 6 डिसेंबरला मुंबईला येण्यासाठी धावणार 12 विशेष लोकल, मध्य रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक


