Mumbai Local: लोकलचा 2 दिवस खोळंबा! कर्जत- खोपोली दरम्यान लोकल बंद, कारण काय?

Last Updated:

खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल सेवा विस्कळीत होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात आली आहे.

मुंबई लोकल
मुंबई लोकल
मुंबई : कर्जत आणि खोपोली स्थानकादरम्यान तांत्रिक कामांसाठी एक विशेष रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल सेवा विस्कळीत होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयीची माहिती देण्यासाठी ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सीएसटी ते कर्जत आणि कर्जत ते सीएसटी लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालणार आहेत
हा विशेष ब्लॉक सोमवार (३ नोव्हेंबर) आणि मंगळवार (४ नोव्हेंबर) रोजी लागू होईल. ब्लॉकच्या कालावधीत, कर्जत आणि खोपोली दरम्यान १२:०० आणि १३:१५ वाजताच्या कर्जत-खोपोली लोकल रद्द केल्या जातील. तसेच खोपोलीहून कर्जतला जाणाऱ्या ११:२० आणि १२:४० वाजताच्या अप लोकल रद्द केल्या जातील.
कर्जत आणि खोपोली स्थानक दरम्यान अत्यावश्यक दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. या ब्लॉकमुळे दैनंदिन प्रवासावर परिणाम होणार असल्याने खोपोली आणि कर्जत परिसरातील प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करावा.
advertisement

कसं असेल कर्जत- खोपोली दरम्यान वेळापत्रक?

  • खोपोलीहून कर्जतला जाणाऱ्या ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल १०:०० वाजता असेल.
  • कर्जतहून खोपोलीला जाणाऱ्या ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल १०:४० वाजता असेल.
  • ब्लॉक संपल्यानंतर खोपोलीहून कर्जत/सीएसटीला जाणारी पहिली लोकल १३:४८ वाजता सुटेल, कर्जतला १४:१४ वाजता पोहोचेल आणि सीएसटीला जाईल.
  • ब्लॉक संपल्यानंतर, कर्जत ते खोपोली ही पहिली लोकल दुपारी २:१८ वाजता केपी ५ लोकल असेल.
advertisement
कामावर जाणाऱ्या किंवा इतर महत्त्वाच्या प्रवासाचे वेळापत्रक असलेल्या नागरिकांनी वेळेत पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ घेऊन प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून तांत्रिक कामे सुरळीतपणे पूर्ण होऊ शकतील आणि भविष्यात चांगल्या सेवा पुरवता येतील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: लोकलचा 2 दिवस खोळंबा! कर्जत- खोपोली दरम्यान लोकल बंद, कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement