महाराष्ट्राचं माहीत नाही; पण UP, बिहारसाठी जादा गाड्यांची सोय होणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

Last Updated:

Central Railway: मध्य रेल्वेच्या मास्टरप्लॅनमुळे आता युपी आणि बिहारसाठी जादा गाड्या धावणार आहेत. तसेच CSMT आणि LTT वरील ताण देखील कमी होणार आहे.

महाराष्ट्राचं माहीत नाही, पण UP, बिहारसाठीच्या जादा गाड्यांची सोय होणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन
महाराष्ट्राचं माहीत नाही, पण UP, बिहारसाठीच्या जादा गाड्यांची सोय होणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन
मुंबई : उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांकडे वाढत्या प्रवासी संख्येचा ताण गेल्या काही वर्षांपासून मुंबई रेल्वे स्थानकावर स्पष्टपणे जाणवत होता. दररोज हजारो प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी एलटीटी, सीएसएमटी आणि दादर सारख्या टर्मिनसवर गर्दी करत असताना, आता या समस्येवर उपाय म्हणून मध्य रेल्वेचा मोठा मास्टरप्लॅन प्रत्यक्षात येण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
परळ रेल्वे टर्मिनस उभारणी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विस्तार या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांना प्रकल्प मूल्यांकन समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे मुंबईतील लांब पल्ल्याच्या प्रवासाचे चित्र पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
अंतिम मंजुरीची प्रतीक्षा
अधिकाऱ्यांच्या मते, आता रेल्वे बोर्डाची अंतिम परवानगी मिळणे हा केवळ औपचारिक टप्पा उरला असून, ती डिसेंबरअखेर मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळताच काही महिन्यांत टेंडर प्रक्रिया सुरू होण्याची तयारीही मध्य रेल्वेने केली आहे. कामाचा वेग वाढल्यानंतर मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.
advertisement
एलटीटीचा विस्तार
एलटीटी–विद्याविहारदरम्यान रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या प्रशस्त जागेमुळे, येथे तीन ते चार नवीन फलाट उभारण्याची योजना आधीपासूनच आखली गेली होती. सध्या एलटीटीवरून 26 जोड्या मेल–एक्स्प्रेस गाड्या नियमितपणे धावतात, तर सुट्टीच्या काळात हा आकडा तब्बल 37 जोड्यांपर्यंत पोहोचतो. अतिरिक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यानंतर,
advertisement
1) जास्त गाड्यांना सुटण्याची आणि थांबण्याची सुविधा
2) सण-उत्सव कालावधीत विशेष गाड्या चालविण्याची अधिक लवचिकता
3) गाड्यांच्या वेळापत्रकातील विलंब कमी होणे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
महाराष्ट्राचं माहीत नाही; पण UP, बिहारसाठी जादा गाड्यांची सोय होणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन
Next Article
advertisement
Eknath Shinde Ravindra Chavan: व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?
व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय
  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

View All
advertisement