Mumbai Water Cut: मुंबईत 22 तास पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? पाहा संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून नोव्हेंबर महिन्यातच पाणी जपून वापरावं लागणार आहे. शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा 22 तास बंद राहणार आहे.
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महापालिकेने 14 ते 15 नोव्हेंबर दरम्यान 22 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या कालावधीत मुंबईच्या काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या काळात पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेल्या जलवाहिनीवरील विविध झडपांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनी आणि विहार जलवाहिनीवरील पाइपलाइन बदलण्याचे काम 2 दिवसांत करण्यात येणार आहे. त्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहील.
या भागात पाणीपुरवठा बंद
advertisement
- एन विभाग: राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ.एन.जी.सी. वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर.एन. गांधी मार्ग (15 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.45 मिनिटांपासून सकाळी 8 वाजेपर्यंत)
- एल विभाग: न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस.जी. बर्वे मार्ग कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस वसाहत, कसाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवरार्ड नगर, तक्षशिला नगर, व्ही.एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, चुनाभट्टी फाटक, हिल रोड, ताडवाडी, समर्थ नगर (दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत)
- एम पश्चिम विभाग: टिळक नगर, ठक्कर बाप्पा वसाहत, शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, गोदरेज वसाहत, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत, आणि इतर अनेक भाग.4.एफ उत्तर विभाग: शीव पश्चिम आणि पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, आणि चुनाभट्टीचे काही भाग.
advertisement
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत पाणी साठवून ठेवा आणि पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा. पाणीपुरवठा बंद असलेल्या क्षेत्रांमध्ये पाणी मिळवण्यासाठी नागरिकांनी पाण्याची बचत करावी. तसेच या महत्त्वपूर्ण दुरुस्ती कामामुळे होणाऱ्या असुविधेबद्दल नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 7:46 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईत 22 तास पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? पाहा संपूर्ण माहिती


