Bihar Election Result 2025: रणनीतीकाराची जादू चालली; तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांच टेन्शन वाढलं; पहिल्या कलात आघाडीवर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पहिल्या कलानुसार निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने एनडीए आणि महागठबंधनचे टेन्शन वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.
Bihar Election Result 2025: बिहारमध्ये नीतिशकुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव? कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगत आहे. मात्रा हाती आलेल्या पहिल्या कलानुसार निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने एनडीए आणि महागठबंधनचे टेन्शन वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीतील २४३ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. पहिल्या कलानुसार महागठबंधन पिछाडीवर तर एनडीएची गाडी हळूहळू पुढे जाताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलात प्रशांत किशोर यांच्या पक्षाने तीन जागांवर आघाडी घेतली आहे. बिहारच्या कारगहर, चनपटिया आणि कुम्हारार या जागांवर ते आघाडीवर आहे.
कोणाची कुठे आघाडी?
जन सुराज पक्षाचे उमेदवार रितेश पांडे यांच्यामुळे बिहारच्या काराघर मतदारसंघातील निवडणूक रंजक बनली आह. सुरुवातीच्या कलात त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे एनडीए आणि महाआघाडी , बसपाचे उदय प्रताप सिंह त्यांना काँटे की टक्कर देत आहे . दरम्यान, जन सुराजचे मनीष कश्यप चनपाटिया विधानसभा मतदारसंघातील पहिल्या कलात आघाडीवर आहेत. भाजपने एनडीएचे विद्यमान आमदार उमाकांत सिंह यांना उमेदवारी दिली आहे, तर महाआघाडी समर्थित काँग्रेसचे उमेदवार अभिषेक रंजन देखील या जागेवर निवडणूक लढवत आहेत. तर बिहारमधील कुम्हारार विधानसभा मतदारसंघातील तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलामध्ये जनसुराज्य पक्षाचे उमेदवार केसी सिन्हा या जागेवर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
advertisement
मतमोजणीला सुरुवात
बिहारमधील 243विधानसभा जागांसाठी शुक्रवारी सकाळी कडक सुरक्षेत मतमोजणी सुरू झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन टप्प्यातील निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता 46 मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, प्रथम पोस्टल बॅलेट सुरू झाले, त्यानंतर सकाळी 8.30 वाजता ईव्हीएम मोजणी सुरू झाली.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 65% मतदान झाले आणि दुसऱ्या टप्प्यात विक्रमी 68.5 % मतदान झाले. बिहारचे 74.5 दशलक्ष मतदार 2616 उमेदवारांचे निवडणूक भवितव्य ठरवतील, ज्याचा निकाल आज संध्याकाळपर्यंत अंतिम होईल.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 14, 2025 9:17 AM IST
मराठी बातम्या/देश/
Bihar Election Result 2025: रणनीतीकाराची जादू चालली; तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांच टेन्शन वाढलं; पहिल्या कलात आघाडीवर


