Delhi Blast CCTV VDIEO: दिल्ली कार स्फोटाचा नवा CCTV VIDEO, 6 सेकंदात सगळं संपलं

Last Updated:

संध्याकाळची वेळ गाड्यांची वर्दळ, अचानक स्फोटाचा भयंकर आवाज अन् आगीचा गोळा बनली कार, दिल्ली कार स्फोटाचा पहिला CCTV VIDEO

News18
News18
प्रशांतलिला रामदास, प्रतिनिधी दिल्ली: संध्याकाळची वेळ गाड्यांची वर्दळ, मेट्रो स्टेशनच्या बाहेररुन जाणाऱ्या गाड्यांची वर्दळ असताना अचानक एका गाडीत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या गाड्याही या स्फोटात सापडल्या आणि त्यांचं नुकसान झालं. ६ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं सगळं संपलं. दिल्लीतील या भीषण स्फोटाचा पहिला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारा हा सीसीटीव्ही व्हिडीओ आहे.
10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी झालेल्या दिल्लीतील कार स्फोटात आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सीसीटीव्हीमध्ये दिसतंय की ट्रॅफिक सिग्नल सुटला आहे, गाड्या हळूहळू पुढे सरकत आहेत त्याच वेळी हा भयंकर स्फोट झाला. त्यामुळे या स्फोटात जास्त गाड्यांचं नुकसान झालं. हळूहळू पुढे चाललेल्या कारमध्ये ब्लास्ट झाला आणि आगीचा गोळा बनली.
advertisement
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर 1 जवळ ट्रॅफिक सिग्नलजवळ हा भीषण स्फोट झाला. बॉम्ब स्फोटचा तपास करण्यासाठी NIAच्या 10 सदस्यांची विशेष टीम गठीत कऱण्यात आली आहे. ADG विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू करण्यात आली आहे. या विशेष पथकात एक IG स्तराचे अधिकारी, दोन DIG, तसेच तीन SP आणि एक DSP दर्जाचे अधिकारी सहभागी आहेत. तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी NIA आणि दिल्ली पोलिसांचे अधिकारी एकत्रितपणे काम करत आहेत. दरम्यान NIAच्या टीममध्ये मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात तपास होणार आहे.
advertisement
advertisement
दिल्लीतील दहशतवादी कटाशी संबंधित तपासात नवे धागेदोरे समोर आले आहेत. I-20 कारसह संशयित उमर मोहम्मद दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास CCTV मध्ये दिसला आहे. हीच कार मयूर विहार भागातही आढळली आहे. तपासात उघड झाले आहे की या जैश मॉड्यूलचा हँडलर परदेशातून सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या माध्यमातून निर्देश देत होता. सुरक्षा यंत्रणांनी या परदेशी हँडलरचीही ओळख पटवली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Delhi Blast CCTV VDIEO: दिल्ली कार स्फोटाचा नवा CCTV VIDEO, 6 सेकंदात सगळं संपलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement