14 मोबाईल, अश्लील फोटोंचा खजिना, हनिट्रॅपसाठी काश्मिरी मुलींचा वापर, दिल्ली स्फोटाची Inside स्टोरी

Last Updated:

Delhi Red Fort Car Blast: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत उत्तर प्रदेशातून पाच डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो
Delhi Red Fort Car Blast: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि दिल्ली पोलिसांसह एटीएसने लखनऊ, सहारनपूर, मुझफ्फरनगर, कानपूर आणि हापूर येथे छापे टाकले. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत उत्तर प्रदेशातून पाच डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
यात सहारनपूरमध्ये डॉ. आदिल, फरिदाबादमध्ये डॉ. शाहीन सईद, तिचा भाऊ परवेझ अन्सारी याला एटीएसने लखनऊमध्ये अटक केली. कानपूर मेडिकल कॉलेजमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मोहम्मद आरिफ (३२) यालाही एटीएसने अटक केली. हापूरमधील खाजगी जीएस मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर डॉ. फारूक (३४) लाही ताब्यात घेण्यात आलं.

हनिट्रॅपसाठी काश्मीरी मुलींचा वापर

दरम्यान, डॉ. आदिलबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. डॉ. आदिलने सहारनपूरमधील डॉक्टरांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी काश्मिरी मुलींचा वापर केल्याचे वृत्त आहे. सुरक्षा एजन्सींना छापेमारीत जप्त केलेल्या १४ मोबाईल फोनमधून असंख्य नंबर आणि अश्लील फोटो आढळले आहेत.शिवाय, डॉ. आदिल हा २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत गायब होता. या काळात तो घरी किंवा नोकरीवर रुग्णालयात नव्हता. त्यामुळे आदिल जवळजवळ एक वर्ष कुठे गायब होता? तो कुणाच्या संपर्कात होता? या प्रश्नांची उत्तरं स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)कडून शोधली जात आहेत.
advertisement

एका पोस्टरमुळे आदिल जाळ्यात अडकला

१७ ऑक्टोबर रोजी नौगाम परिसरात मौलवी इरफानने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित पोस्टर्स लावले होते. पोस्टर्स लावणाऱ्यांमध्ये आरिफ निसार दार उर्फ ​​साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार यांचा समावेश होता. जे नौगामचे रहिवासी होते. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी श्रीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आरोपींची चौकशी केली असता मौलवी इरफान आणि डॉ. आदिल यांच्या सांगण्यावरून पोस्टर्स लावण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मौलवी इरफानला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, जमीर अहमद अहंगरलाही अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. आदिलचा शोध सुरू केला.
जेव्हा पोलीस जमीरसह डॉ. आदिलच्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांना कळले की तो १ नोव्हेंबर रोजी सहारनपूरला आला होता आणि तिथल्या एका रुग्णालयात काम करत होता. ६ नोव्हेंबर रोजी, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मदतीने, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिलला सहारनपूर येथून अटक केली.
view comments
मराठी बातम्या/देश/
14 मोबाईल, अश्लील फोटोंचा खजिना, हनिट्रॅपसाठी काश्मिरी मुलींचा वापर, दिल्ली स्फोटाची Inside स्टोरी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement