IAF Trainer Aircraft : हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळाचा पहिला VIDEO

Last Updated:

भारतीय हवाई दलाचे PC-7 Mk II प्रशिक्षण विमान नियमित सराव सुरू असताना ही घटना घड

News18
News18
चेन्नई: चेन्नईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईच्या तांबरम हवाई तळाजवळ भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने पायलट वेळीच बाहेर पडला. विमानही मोकळ्या जागेत पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सराव सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि  पिलाट्स PC-7 विमान कोसळलं. एका घराजवळ हे विमान कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु पायलट धडकण्यापूर्वीच सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला.  हवाई दलाने या घटनेबद्दल चौकशीचे आदेश दिले आहे. तसंच प्रकरणावर स्पष्टीकरणही दिलं आहे.  'पिलाटस PC-7 बेसिक ट्रेनर हे विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते तेव्हा ही घटना घडली.
advertisement
advertisement
भारतीय हवाई दलाचे PC-7 Mk II प्रशिक्षण विमान नियमित सराव सुरू असताना ही घटना घडली.  आज चेन्नईतील तांबरमजवळ सुमारे २.२५ वाजेच्या सुमारास हे विमान कोसळलं. पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला.  विमान हे मोकळ्या जागेत कोसळलं, त्यामुळे  नागरी मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालं नाही, अशी माहिती IAF कडून देण्यात आली. या अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशी आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
वर्षभरात विमान कोसण्याची तिसरी घटना
आतापर्यंत या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आयएएफ विमान अपघातांच्या मालिकेनंतर काही महिन्यांतील ही चौथी घटना घडली आहे. या आधी जुलैमध्ये राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळील एका प्रशिक्षण सरावादरम्यान एक जग्वार लढाऊ विमान शेतात कोसळलं होतं. या दुर्घटनेत २  हवाई दलाच्या जवानांचा मृत्यू झाला होता.
तर, दुसरी घटना ही २ आसनी जेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून आणि हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात स्क्वाड्रन लीडर लोकेंद्र आणि फ्लाइट लेफ्टनंट ऋषी यांनी विमान खाली पडण्यापूर्वी ते दूर नेलं. या दुर्घटनेत दोन्ही पायलट जखमी झाले होते.
advertisement
या वर्षीचा हा तिसरा जग्वार विमान अपघात होता. मार्चमध्ये नियमित उड्डाणादरम्यान हरियाणातील अंबालाजवळ सिस्टम बिघाडामुळे आणखी एक जग्वार लढाऊ विमान कोसळलं होतं. पण पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला. एका महिन्यानंतर, जामनगरजवळ एका जग्वार अपघातात आणखी एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान एका पायलटचा मृत्यू झाला होता.
view comments
मराठी बातम्या/देश/
IAF Trainer Aircraft : हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळाचा पहिला VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement