अजून एक मुख्यमंत्री भाजपच्या संपर्कात, सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू, भूकंपाचे संकेत

Last Updated:

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन हे दिल्ली दौऱ्यावर असून तेथील भाजप नेत्यांना भेटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

News18
News18
Jharkhand  Assembly :  झारखंडमध्ये सध्या राजकारण तापलेलं पाहयला मिळत आहे. झारखंडमधील राजकीय समीकरणे नजीकच्या काळात बदलण्याची शक्यता आहे. कारण झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजप एकत्रितपणे सरकार स्थापन करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन हे दिल्ली दौऱ्यावर असून तेथील भाजप नेत्यांना भेटणार आहे. तसेच भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांवर चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
झारखंडमध्ये सध्या JMM, काँग्रेस,RJD आणि डावे यांचं युती सरकार आहे, ज्यांच्याकडे विधानसभेच्या 81 पैकी56 जागा आहेत. पण जर JMM ने भाजपसोबत युती केली तर बहुमतासाठीचा आकडा सहज गाठू शकतात. संभाव्य परिस्थितीत JMM ( 34) आणि भाजप ( 21) बरोबर LJP, AJSU आणि JDU च्या प्रत्येकी एक जागेसह 58 पर्यंत पोहचू शकतात. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहेत. त्यामुळे सरकार सहज स्थापन करता येणार आहे.
advertisement

सरकार स्थिर असून  कार्यकाळ पूर्ण करणार 

यासंदर्भात प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राकेश सिन्हा प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, ज्यांना असे वाटते ते मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. भाजपकडे आता कोणतेही काम उरलेले नाही, अशा अफवा जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. भाजपचे अनेक आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत. सरकार स्थिर असून  कार्यकाळ पूर्ण करेल.
advertisement

भाजपने चर्चा फेटाळल्या

दुसरीकडे, भाजपनेही या चर्चांचे खंडण केले असून चर्चा निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे जर कोणाला असे वाटत असेल की भाजप आणि झामुमो भविष्यात एकत्र सरकार स्थापन करतील, तर ते अशक्य आहे. आम्ही त्यांच्या विचारांना विरोध करतो आणि ते आमच्या विचारांना विरोध करतात. त्याच्यावर असंख्य आरोप आहेत. अशा परिस्थितीत हेमंत सोरेन दिल्लीला का गेला आहे हे तेच सांगू शकतात.
view comments
मराठी बातम्या/देश/
अजून एक मुख्यमंत्री भाजपच्या संपर्कात, सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू, भूकंपाचे संकेत
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement