Bigg Boss मधून बाहेर पडताच तान्या मित्तलने सर्वांत आधी गाठलं प्रसिद्ध ठिकाण, आहे मुंबईकरांची फेव्हरेट जागा!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Fame Tanya Mittal: 'बिग बॉस १९' मधून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तलने मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणाला भेट दिली आहे. तिथे पोहोचल्यावर तिला खास सरप्राइजही मिळालं आहे.
मुंबई: स्पिरिच्युअल इन्फ्लूएन्सर आणि सोशल मीडिया स्टार तान्या मित्तल 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी झाल्यानंतर रातोरात स्टार बनली. सलमान खानच्या या शोमध्ये ती तिसरी रनर-अप ठरली. शो हरल्यानंतरही ती सकारात्मक असून, प्रेक्षकांची मने जिंकल्याचे तिने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर तिने नुकतीच मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणाला भेट दिली आहे. तिथे पोहोचल्यावर तिला खास सरप्राइज मिळालं आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला दिली भेट
तान्या मित्तलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिद्धिविनायक मंदिराला भेट दिल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर मंदिराबाहेर तान्याने शालेय विद्यार्थ्यांशी खूप प्रेमाने आणि आनंदाने संवाद साधला.
advertisement
लहान मुलेही तिला ओळखत असल्याचे पाहून तान्या भावुक झाली. तिने त्यांच्याशी हात मिळवले आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. या व्हिडिओला तान्याने एक भावनिक कॅप्शन दिले आहे, "मी खरोखरच हरले का?? गणपती बाप्पा मोरया." तिच्या या कॅप्शनमुळे तिला शोच्या निकालाबद्दल काहीही दुःख नसल्याचे दिसून येते.
advertisement
फेक म्हणणाऱ्यांना दिलं सणसणीत उत्तर
ग्वाल्हेरस्थित तान्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि नेटकरी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 'बिग बॉस १९' च्या घरात तान्या नेहमीच तिच्या आलिशान जीवनशैलीबद्दल आणि संपत्तीबद्दल बोलत असे, ज्यामुळे अनेक स्पर्धकांनी तिला फेक ठरवले होते. या टीकेला शोमधून बाहेर आल्यानंतर तिने उत्तर दिले.
advertisement
एका मुलाखतीत तान्या म्हणाली, "मी कोण आहे याबद्दल मी नेहमीच स्पष्ट राहिले आहे. मी एका विशिष्ट सवयी आणि सोयीसुविधांमध्ये मोठी झाले आहे आणि यावर प्रश्न का उपस्थित व्हावा, हे मला कळत नाही. मी माझ्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्च करते कारण मी त्यासाठी काम करते. त्यामुळे मी ढोंगी होत नाही. जर ३० वर्षांची महिला स्वतःची काळजी घेऊ शकत असेल, तर त्यात काय समस्या आहे?" असा सवालही तिने केला.
advertisement
'बिग बॉस १९' मध्ये गौरव खन्ना विजेता ठरला, तर फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे अनुक्रमे पहिले आणि दुसरे रनर-अप ठरले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 8:04 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Bigg Boss मधून बाहेर पडताच तान्या मित्तलने सर्वांत आधी गाठलं प्रसिद्ध ठिकाण, आहे मुंबईकरांची फेव्हरेट जागा!









