Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणी नवी अपडेट, पोलीस शोधताय लाल रंगाची Ecosposrts कार, कुठे दिसली तर..

Last Updated:

पोलीस टीम लाल रंगाच्या फोर्ड ईकोस्पोर्टचा शोध घेतल आहे. या कारमध्ये काही जणांनी फरीदाबादहून दिल्लीत एंट्री केली आहे.

News18
News18
दिल्ली: दिल्ली कार स्फोट प्रकरणी अद्यापही ठोस अशी कोणतीही माहिती समोर आली नाही. स्फोटामध्ये वापरण्यात आलेली हुंदाई i20 कारचा मालक कोण होता आणि कार कुठून कुठे गेली, याचा तपास केला जात आहे. अशातच आणकी एक दिल्लीमध्ये आढळली. फोर्ड मोटर्सची लाल रंगाची ईको स्पोर्टस् एसयूव्ही पोलिसांच्या रडारवर आली आहे. या कारमध्ये काही जण दिल्लीत शिरले असल्याची माहिती समोर आली आहे. या कारचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरिदाबाद आणि दिल्ली उत्तर जिल्हा पोलीस टीम लाल रंगाच्या फोर्ड ईकोस्पोर्टचा शोध घेतल आहे. या कारमध्ये काही जणांनी फरीदाबादहून दिल्लीत एंट्री केली आहे. ही संशयास्पद कार अजून पोलिसांना सापडली नाही. या कारचा सगळी शोध घेतला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम या कारचा शोध घेत आहे. उमरने i 20 कारने दिल्लीत प्रवेश केला होता. त्याच्यासोबत कारमध्ये कुणीही नव्हतं. त्याच्यासोबत दुसरी कोणतीही गाडी नव्हती. पण, आता उत्तर जिल्हा पोलिसांच्या टीमने एक माहिती दिली आहे.  i 20 कारचं नाहीतर आणखी एक लाल रंगाची ईको स्पोर्ट्स कारबद्दल अलर्ट आला होता. ही कार उमरसोबतच होती.
advertisement
पण पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा i-20 कारसोबत कोणतीही कार आढळली नाही. त्यामुळे जर अलर्ट होता तर लाल रंगाची ही कार कुठे गेली, याचा पोलीस आता शोध घेत आहे. दिल्ली पोलिसांनी  DL10-CK-0458 असा या कारचा नंबर दिला आहे. या कारला एक फास्ट टॅग लावलेला आहे. जो उमरच्या नावावर आहे.
कार स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहे. जखमींवर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भुतान दौऱ्यावर गेले होते. आज ते दौऱ्यावर परतले आणि त्यांनी एलएनजेपी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.  या स्फोट प्रकरणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशसह सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. ठिकठिकाणी तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणी नवी अपडेट, पोलीस शोधताय लाल रंगाची Ecosposrts कार, कुठे दिसली तर..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement