Bihar Election: बिहारचा हनुमान कोण? मोदींचा माणूस ठरला जायंट किलर, एका झटक्यात संपूर्ण समीकरण मोडून काढलं
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Bihar Election: बिहारच्या राजकारणात मोदींच्या ‘हनुमानाने’ 2100% ची प्रचंड झेप घेत संपूर्ण समीकरण एका झटक्यात बदलून टाकले आहे. नीतीश पासून तेजस्वीपर्यंत सर्व विरोधी नेते या स्फोटक वाढीसमोर पूर्णपणे हादरले आहेत.
पाटणा: बिहार विधानसभा निवडणूक 2025 मधील आतापर्यंत आलेल्या कलांनुसार राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणे निश्चित मानले जात आहे. या निवडणुकीत महागठबंधनातील सर्व घटक पक्षांचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात कमकुवत दिसत आहे, तर एनडीएमध्ये सहभागी पक्षांनी प्रभावी आघडी घेतली आहे.
advertisement
मागील निवडणुकीत 110 जागांवर लढलेल्या भाजपने 19.46 टक्के मतांसह 74 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने 122 जागांवर उमेदवार उभे करून 15.39 टक्के मते मिळवली आणि 73 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
advertisement
तेजस्वी यादवने थेट पक्षच बुडवला, केल्या 52 घोडचुका; पराभवाची Inside story
मागील निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांनी एनडीएपासून वेगळे होऊन तब्बल 135 जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र त्या वेळी पक्षाच्या नावावर फक्त एकच जागा जमा झाली होती. पण या निवडणुकीत परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. दुपारी 1 वाजता हाती आलेल्या कलांनुसार चिराग पासवान यांच्या एलजेपी (आर) ला तब्बल 22 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसते, जे पक्षासाठी मोठे पुनरागमन मानले जात आहे.
advertisement
PK है क्या? किंग मेकरने लिहली स्वत:च्या पराभवाची स्क्रिप्ट,रॉकेट टेकऑफपूर्वीच...
2025 मधील एनडीएच्या जागावाटपात भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार उभे केले होते. तसेच जेडीयूने आणखी 29, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) ने 6 आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) ने 6 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते.
advertisement
आतापर्यंतचे एकूण कल
भाजप — 88 जागांवर आघाडी
जेडीयू — 79 जागांवर आघाडी
एलजेपी (आर) — 22 जागांवर आघाडी
एचएएम — 4 जागा
आरएलएम — 2 जागा
महागठबंधनातील पक्षांमध्ये—
advertisement
आरजेडी — 30 जागा
काँग्रेस — 6 जागा
सीपीआय (एमएल) — 8 जागा
व्हीआयपी — 1 जागा
सीपीआय — 6 आणि सीपीएम — 1 जागांवर स्पर्धा
या निवडणुकीत आरजेडीने 143 जागांवर, काँग्रेसने 60, सीपीआय (एमएल) ने 20, व्हीआयपीने 11, सीपीआयने 6 आणि सीपीएमने 4 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र निकाल किंवा कल पाहता महागठबंधनला मतदारांचा पुरेसा पाठिंबा मिळालेला दिसत नाही.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 1:32 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Bihar Election: बिहारचा हनुमान कोण? मोदींचा माणूस ठरला जायंट किलर, एका झटक्यात संपूर्ण समीकरण मोडून काढलं


