अत्यंत भयानक अपघात, एक्स्प्रेसवेवर कार दरीत कोसळली; 15 वर्षीय मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू, Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Car Accident: दिल्ली–मुंबई एक्स्प्रेसवेवर रतलामजवळ वेगाने धावणारी कार नियंत्रण सुटून थेट दरीत कोसळली आणि क्षणात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चालकाची झोप किंवा अतिवेग या पैकी एक कारण या भीषण दुर्घटनेमागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रतलाम: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दिल्ली–मुंबई एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रावत़ी पोलिस ठाणे हद्दीत जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीहून मुंबईकडे वेगाने जात असलेली कार अचानक नियंत्रणातुन सुटली आणि एक्स्प्रेसवेवरील अॅल्युमिनियम बॅरिअर तोडत रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली.
advertisement
रतलामचे पोलिस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितले की- कारचा वेग अतिशय जास्त होता, कारण तिने ज्या बॅरिअरला धडक दिली तो बॅरिअर मजबूत धक्काही सहन करण्यास सक्षम असतो. प्रथमिक तपासात असे दिसून आले आहे की गाडीचा चालक कदाचित झोपेच्या झटक्याने नियंत्रण गमावून बसला. ज्यामुळे वाहन रस्त्याबाहेर जाऊन थेट दरीत पडले.
advertisement
#Ratlam Delhi-Mum Expressway🚨⚠️
- Footage 7:47am, #Black SUV (maybe KIA Carens) goes off the road…5 Dead as per news…
- Flat Stretch, Drowsy Driver?⚠️
- No Crash Barriers on E’way @DriveSmart_IN @dabir @InfraEye @sss3amitg
pic.twitter.com/44eekGUoE2
— Dave (Road Safety: City & Highways) (@motordave2) November 14, 2025
advertisement
या भीषण अपघातात वाहनातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 वर्षांचा मुलगा आणि 70 वर्षांचे वयोवृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढले आणि त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवले.
advertisement
पोलिसांनी अपघाताचे कारण स्पष्ट करण्यासाठी सविस्तर तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार चालक काही क्षण झोप लागल्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन हा भीषण अपघात झाला असावा परंतु अंतिम निष्कर्ष तपासानंतरच मिळणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 5:52 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
अत्यंत भयानक अपघात, एक्स्प्रेसवेवर कार दरीत कोसळली; 15 वर्षीय मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू, Video


