PM Kisan चा 21 वा हप्ता नोव्हेंबरच्या कोणत्या आठवड्यात येणार? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:
PM Kisan 21 Installment : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-Kisan) तीन राज्यांतील शेतकऱ्यांना आधीच २१वा हप्ता देण्यात आला आहे.
1/5
pm kisan yojana
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-Kisan) तीन राज्यांतील शेतकऱ्यांना आधीच २१वा हप्ता देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्यात आला आहे.
advertisement
2/5
pm kisan yojana
या राज्यांमध्ये अलीकडेच अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, शेतीयोग्य जमीन साचलेल्या पाण्यामुळे वाया गेली आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेत या राज्यांतील शेतकऱ्यांना मदत देण्यास प्राधान्य दिले.
advertisement
3/5
pm kisan yojana
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार?  - अधिकृत माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता थेट जमा करण्यात आला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रु जमा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
advertisement
4/5
pm kisan
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
advertisement
5/5
pm kisan
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि इतर शेतीसंबंधित खर्चांसाठी थोडासा आर्थिक आधार मिळावा हा आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement