फक्त पैसे मोजायचे! शुक्राचं गोचर २५ नोव्हेंबरपर्यंत या राशींना करणार मालामाल
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालांतराने राशी व नक्षत्र बदलतो, ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर होतो. त्यापैकी शुक्र ग्रह हा धन, वैभव, सौंदर्य, प्रेम आणि भौतिक सुखाचा अधिपती मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालांतराने राशी व नक्षत्र बदलतो, ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर होतो. त्यापैकी शुक्र ग्रह हा धन, वैभव, सौंदर्य, प्रेम आणि भौतिक सुखाचा अधिपती मानला जातो. पंचांगानुसार नोव्हेंबर २०२५ च्या सुरुवातीला शुक्र ग्रहाने आपल्या स्वराशी तूळ राशीत प्रवेश केला आहे, आणि तो २५ नोव्हेंबरपर्यंत या राशीतच भ्रमण करणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, नवी संधी आणि कौटुंबिक सुखाचा आशीर्वाद मिळेल. पाहूया कोणत्या राशींसाठी हा काळ लाभदायी ठरणार आहे.
advertisement
मिथुन - शुक्राचा गोचर मिथुन राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ संकेत देणारा ठरेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. या काळात कुटुंबातील जुने वाद मिटतील आणि परस्पर संबंध दृढ होतील. प्रवासातून लाभ होईल. काही जणांना धार्मिक यात्रांचे योग येतील. एकूणच, शुक्रामुळे आर्थिक व वैयक्तिक जीवन दोन्ही स्थिर आणि सुखी होईल.
advertisement
कन्या - कन्या राशीसाठी हा काळ इच्छा पूर्तीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल. नव्या प्रकल्पात यश मिळेल. ज्यांना नोकरीतील बदल हवे आहेत, त्यांच्यासाठी उत्तम संधी निर्माण होतील. वैवाहिक जीवनात समाधान राहील. कुटुंबात आनंद आणि एकोपा वाढेल. या काळात सकारात्मक विचारसरणीमुळे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. नवे संबंध प्रस्थापित करण्यास हा काळ योग्य आहे. संपत्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
धनु - धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा गोचर भाग्यवृद्धीचे संकेत देतो. करिअर, शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात नवे दरवाजे उघडतील. आर्थिक स्थिती सुधारेल, तसेच नवे उत्पन्न स्रोत निर्माण होतील. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. काही जणांना परदेशातून संधी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतील.
advertisement
मकर - मकर राशीसाठी शुक्र ग्रहाचा प्रभाव सकारात्मक बदल आणि यशाचे दार उघडणारा आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडू शकतात. ज्यांना प्रमोशनची प्रतीक्षा आहे, त्यांना शुभ वार्ता मिळेल. भाग्याची साथ लाभेल, आणि मेहनतीला योग्य फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याचा असेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील, तसेच कौटुंबिक वातावरण शांत आणि आनंदी राहील.


