Numerology: नवीन 2026 सूर्याचं वर्ष! या 4 जन्मतारखा असणाऱ्यांसाठी सुवर्णकाळ, मोठा टप्पा गाठणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology 2026: पंचागानुसार प्रत्येक वर्ष ठराविक ग्रहाचे असते, त्यानुसार येणारे नवीन 2026 वर्ष सूर्य ग्रहाचं असणार आहे. प्रत्येक ग्रह ठराविक मूलांकाचा अधिपती असतो, त्यानुसार मूलांक 1 चा अधिपती सूर्य ग्रह आहे. नवीन वर्षाला सूर्याचं वर्ष म्हटलं जात आहे. ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचा येत्या वर्षात जास्त प्रभाव असेल.
advertisement
advertisement
मूलांक 1 असलेल्यांसाठी 2026 हे वर्ष कसे राहील?जबरदस्त आत्मविश्वास : नवीन वर्ष 2026 मध्ये मूलांक 1 च्या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास दिसून येईल. अनोखं साहस आणि पराक्रमाच्या जोरावर प्रत्येक मोठी संधी मिळवू शकता. पण अतिआत्मविश्वासाने घेतलेले निर्णय तुमचे नुकसान देखील करू शकतात. त्यामुळे तर्कशुद्ध विचार करूनच मोठे निर्णय घ्या. तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा चांगली असेल.
advertisement
वडिलांचे सहकार्य: या वर्षी मूलांक 1 च्या लोकांना त्यांच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या सहकार्याने तुम्ही करिअरमध्ये मोठी उद्दिष्ट्ये साध्य करू शकता. तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू शकता किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय पुढे वाढवू शकता. या वर्षी वडील आणि मुलांमध्ये उत्कृष्ट समन्वय दिसून येऊ शकतो.
advertisement
धन-संपत्तीत वाढ: 2026 हे वर्ष तुमच्या उत्पन्नाच्या दृष्टीनेही चांगले मानले जात आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आर्थिक स्थिती भक्कम होईल. तुम्ही मौल्यवान वस्तूंवर पैसे खर्च कराल, पैसा चांगल्या पद्धतीनं मिळत राहील. या वर्षी तुम्ही खूप धन कमवाल आणि पैशाची बचतही कराल. भविष्यासाठी कोणत्याही मोठ्या योजनेत गुंतवणूक करण्याचीही शक्यता आहे.
advertisement
आरोग्यात सुधारणा: आरोग्याच्या दृष्टीनेही हे नवीन वर्ष उत्तम दिसत आहे. कोणत्याही जुन्या आजारातून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तुम्हाला मानसिक शांती आणि ऊर्जेचा अनुभव येईल. प्रवासाचे प्रबळ योग आहेत. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा फिरण्याचे जे स्वप्न तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत आहात, ते या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


