Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशींसाठी गेमचेंजर दिवस, फक्त मंगळवारी ही चूक नको, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Daily Horoscope: आज मंगळवारी देवी दुर्गाची मेष ते मीन सर्व राशींवर कृपा असेल. प्रेम, पैसा, आरोग्य, नोकरी, करिअर, गुंतवणूक, विवाह यांबाबत तुमच्या नशिबी काय? हे नाशिकमधील ज्योतिषी समीर जोशी गुरुजी यांच्याकडून जाणून घेऊ.
मेष राशी - पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल - त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. हाती घेतलेले काम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार.
advertisement
advertisement
मिथुन राशी - आज तुम्ही रिकाम्या गोष्टींमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात, परंतु तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्यांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
कर्क राशी - तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल - म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. आजच्या दिवशी सावधगिरी बाळगा. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
सिंह राशी - आज कुणी विपरीत लिंगीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असणार आहे.
advertisement
कन्या राशी - व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. व्यापारी भागीदार आपला फायदा घेतील. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. आज तुमचा शुभ अंक 2 असून रंग हिरवा असणारा आहे.
advertisement
धनु राशी - आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवेल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्यावे लागेल. या राशीतील विद्यार्थी आज आपल्या खोडकर वर्तवणुकीमुळे संपूर्ण दिवस खराब करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग आकाशी असणार आहे.
advertisement
मकर राशी - तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे जोडीदार वेळ देता येणार नाही. अविवाहित मंडळी आज आपले स्वप्न पूर्ण करतील. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
मीन राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही, आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. आज तुमचा शुभ अंक 4 असून रंग हा लाल आहे.
advertisement


