Aajache Rashibhavishya: पैसा, प्रेम, विवाह अन् व्यापार, मेष ते मीन राशींसाठी कसा असेल शुक्रवार? आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: मेष ते मीन 12 राशींसाठी शुक्रवार नव्या संधी घेऊन येणार आहे. नोकरी, आरोग्य, पैसा, प्रेम, विवाह, व्यापार याबाबत तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी -आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरू करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. आजचा दिवस मध्यान्हापर्यंत थोडा कठीण जाईल. धीर सोडू नका. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार.
advertisement
वृषभ राशी-तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणारा आहे.
advertisement
मिथुन राशी -प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
कर्क राशी -आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो जर तुम्ही हा सल्ला अमलात आणला तर, तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो किंवा ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
सिंह राशी -आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. अविवाहित मंडळींना आनंदाची बातमी मिळेल. तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
कन्या राशी -जमिनी संदर्भात व्यवहार आज करणे शुभ ठरेल. मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. आज अनेक लोक तुमचा सल्ल्याने कामे करतील. तुम्ही हाती घेतलेले काम आज सहज रित्या पूर्ण होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
तुळ राशी -तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. व्यवसायात लाभ होईल. आज तुमचा शुभ अंक 8 असून रंग पांढरा असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी -आजचा दिवस आनंदाचा असेल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. महत्त्वाची कामे आज मार्गी लागतील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आज तुम्ही करत असलेल्या कामात काहीसा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्य सांभाळा. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग केशरी आहे.
advertisement
धनु राशी -तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
मकर राशी -काही तरी नवीन कामे हाती घेताना त्या कामाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल - पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. व्यापारी वर्गाला आज चांगलाच फायदा होणार आहे. आज तुमच्या साठी शुभ अंक 7 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी -स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल - तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. आज जोडीदार आनंदाची बातमी सांगेल. तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
मीन राशी -निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement


