Budh Nakshatra Gochar: करेल त्याचे उलटे परिणाम, बुधवारपासून या राशी अडचणीत; शनिच्या नक्षत्रात बुधगोचर अनलकी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी बुध ग्रह विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून शनीच्या अनुराधा नक्षत्रामध्ये संक्रमण करेल. बुधाच्या संक्रमणामुळे काही राशींना आर्थिक अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन विस्कळीत आणि त्रासदायक होऊ शकते.
advertisement
मिथुन - बुधाचे मिथुन राशीवर अधिराज्य असले तरी या नक्षत्रातील त्याचा बदल तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. तुमच्या विरोधकांची संख्या वाढू शकते. कामात अलर्ट राहा, प्रत्येक कामात विचारशील राहा, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. तुम्ही अनावश्यक खर्च टाळावा, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यावर उपाय म्हणून तुम्ही भगवान गणेशाची पूजा करावी.
advertisement
कर्क - बुधाच्या नक्षत्र बदलामुळे तुम्हाला नशीब साथ देणार नाही. या काळात तुमचे चालू काम विस्कळीत होऊ शकते. काही लोक अचानक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. मेष राशीच्या लोकांनी सामाजिक वादविवाद टाळावेत. यावर उपाय म्हणून गायीला हिरवा चारा खायला द्यावा.
advertisement
advertisement
मीन राशीच्या लोकांनी पैसा खर्च करताना काळजी घ्या, बचतीला हात लावू नका, त्यानं तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










