शनिदेवांनी या राशींची हाक ऐकली! नवीन वर्षात संकटातून मुक्तता होणार, घरात श्रीमंती येणार

Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायाचा देव मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसारच शनि फळ देतात. चांगल्या कर्मांना फलदायी परिणाम तर चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांना कठोर धडे देतात.
1/6
astrology news
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायाचा देव मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसारच शनि फळ देतात. चांगल्या कर्मांना फलदायी परिणाम तर चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांना कठोर धडे देतात. 2026 हे वर्ष ग्रहांच्या हालचालींमध्ये महत्त्वपूर्ण बदल घेऊन येणार आहे. जरी शनि या वर्षी राशी परिवर्तन करणार नसला, तरी तो तीन वेगवेगळ्या नक्षत्रांत प्रवेश करणार आहे. या नक्षत्र परिवर्तनांमुळे काही विशिष्ट राशींवर नवपंचम राजयोगाचा प्रभाव निर्माण होऊन मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ज्योतिषानुसार, 2026 मध्ये 3 राशींना असामान्य संपत्ती, यश आणि मान-सन्मान लाभू शकतो.
advertisement
2/6
2026 मध्ये शनीचे तीन नक्षत्रांतील संक्रमण
2026 मध्ये शनीचे तीन नक्षत्रांतील संक्रमण पंचांगानुसार 2026 मध्ये शनिची तीन महत्त्वपूर्ण नक्षत्रांमधील भ्रमणयात्रा घडणार आहे. 20 जानेवारी 2026 दुपारी 12:13 पासून आणि 9 ऑक्टोबर 2026 संध्याकाळी 7:28 पर्यंत शनि उत्तरभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करेल. 17 मे 2026 दुपारी 3:49 पासून शनि काही काळासाठी रेवती नक्षत्रात प्रवेश करेल.
advertisement
3/6
astrology
<strong>वृषभ :</strong> 2026 वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. शनीचा प्रवास तुमच्या कुंडलीतील उत्पन्न भावात होणार असल्याने आर्थिक वाढ वेगाने होईल. वर्षभर नवीन कमाईचे मार्ग खुलतील. गुंतवणुकीतूनही तुमच्यासाठी चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये सौहार्द, प्रेम आणि आदर निर्माण होईल. मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. प्रगती करण्यासाठी हा वर्ष अत्यंत अनुकूल आहे.
advertisement
4/6
astrology
<strong>कर्क :</strong> कर्क राशीसाठी 2026 अनेक अडचणींपासून मुक्ती देणारे वर्ष ठरेल. शनिचा प्रवास भाग्यस्थानात होत असल्याने नशीब तुमच्या बाजूने राहील. अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि करिअरमध्ये मजबुती येईल. अध्यात्मिक प्रवास वाढेल, मन:शांती आणि मानसिक समाधान मिळेल. पूर्वीचे अडथळे दूर होतील आणि अनेक क्षेत्रांत यशाची दारे उघडतील. कुटुंब आणि कार्यक्षेत्रात समतोल साधला जाईल.
advertisement
5/6
astrology
<strong>कुंभ :</strong> 2026मध्ये नवपंचम राजयोगाचा सर्वाधिक लाभ मिळवणाऱ्या राशींमध्ये कुंभ राशीही एक आहे. शनिचा प्रवास द्वितीय भावात होणार असल्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. कुटुंबात समाधान, प्रेम आणि शांतता वाढेल. समाजासाठी काम करणाऱ्यांना विशेष मान-सन्मान मिळेल. जुन्या मालमत्तेतून किंवा अडकलेल्या पैशातून अचानक फायदा होईल. तणावपूर्ण नातेसंबंध सुधारण्याची संधीही मिळेल.
advertisement
6/6
astrology
<strong>(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
advertisement
BJP Shiv Sena Clash: भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते  भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव
भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव
  • भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव

  • भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव

  • भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव

View All
advertisement