Shukra Asta: संकटात कोणी हात देणार नाही! 11 डिसेंबरपासून शुक्राचा अस्त काळ या राशींना त्रस्त करेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. शुक्राला पैसेवाला ग्रह असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण तो सुख-संपत्ती-धनाचा कारक ग्रह आहे. शुक्र हा सर्वात वेगाने भ्रमण करणाऱ्या ग्रहांपैकी एक आहे. संपत्ती, समृद्धी, विलास, प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक आहे. कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली असल्यास पैसा माणसाला कमी पडत नाही.
शुक्राचा अस्त काळ अशुभ मानला जातो. शुक्र अस्त स्थितीत असल्यास लग्न करू नये असे सांगितले जाते. शुक्र ग्रह आता लवकरच अस्ताला जाणार आहे. शुक्र अशुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला कधीही प्रेम मिळत नाही. शिवाय, शुक्राच्या स्थितीत झालेला बदल देखील लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. शुक्र 11 डिसेंबर 2025 रोजी अस्ताला जाईल, त्याचा काही राशींना त्रास सहन करावा लागेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शुक्र अस्ताचा राशींवर होणारा परिणाम - शुक्र अस्त होणे वृषभ, तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. परंतु, मेष आणि मिथुन राशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रेम जीवनात समस्या येऊ शकतात. या 51 दिवसांच्या काळात कोणतेही शुभ कार्य करू नका. तसेच, नवीन घरात प्रवेश करणे किंवा घराचे भूमिपूजन करणे यांसारखी कार्येही करू नयेत.
advertisement
शुक्र ग्रह धन आणि विलासाचा कारक असल्याने या काळात भौतिक सुख-सुविधांमध्ये कमतरता येऊ शकते. नातेसंबंधांमध्ये चढ-उतार कायम राहतील. उत्पन्नात घट होऊ शकते, तर खर्च वाढण्याची शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


