7 बेडरूम, 13 बाथरूम अन्... 166 कोटी रुपयांच्या आलिशान महालात राहते ही अभिनेत्री, पाहा INSIDE PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Actress : लोकप्रिय अभिनेत्री 166 कोटी रुपयांच्या आलिशान महालात राहते. अभिनेत्रीच्या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
स्वप्नातील घर कोणाला आवडत नाही? प्रत्येकालाच आपलं घर स्वर्गासारखं सुंदर असावं असं वाटतं. अनेक स्टार्सची घरे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाहीत. आता तुम्ही हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोफिया वेरगारा हिचे उदाहरण घ्या. ‘मॉडर्न फॅमिली’ या सीरिजची स्टार असणाऱ्या अभिनेत्रीच्या घराचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडून फक्त कौतुकाच निघेल. सोफियाचे घर अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आहे.
advertisement
हॉलिवूड अभिनेत्री सोफिया वेरगाराचे घर एखाद्या आलिशान महालापेक्षा काही कमी नाही. अभिनेत्री असण्याबरोबरच सोफिया एक यशस्वी व्यावसायिक महिला (बिझनेसवुमन) देखील आहे. सोफियाचे घर कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली पार्क मॅन्शनमध्ये आहे. हे घर सोफियाने स्वतः नवीन पद्धतीने डिझाइन केले आहे. वोग सोबतच्या एका खास मुलाखतीत सोफियाने आपल्या घराची संपूर्ण सफर करून दिली होती, तसेच तिने घराच्या आतल्या सुंदर नजाऱ्याची झलकही दाखवली होती.
advertisement
सोफियाने हे घर 2020 मध्ये खरेदी केले होते. सोफियाने सांगितले होते की हे घर सुरुवातीला एखाद्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या महालासारखे दिसत होते. पण नंतर तिला वाटले की या घराला पुन्हा नव्याने डिझाइन करण्याची गरज आहे. त्यानंतर तिने हे घर पुन्हा बांधून ते एक सुंदर महालात रूपांतरित केले. सोफियाचे हे घर सुमारे 17,100 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे.
advertisement
advertisement
advertisement
सोफिया वेरगाराने घरात टेनिस कोर्ट देखील तयार केलेला आहे. जिथे ती अनेकदा आपल्या मित्रांसोबत खेळते. याशिवाय, सोफियाच्या घरात एक मोठा स्पा देखील आहे. या आलिशान घरात मोठं किचन आहे, जिथे फ्रेंच भांडी आणि आधुनिक उपकरणे आहेत, ज्याची किंमत सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त आहे. याशिवाय, सोफियाने आपल्या घरात एक वॉक-इन क्लोजेट तयार केलेले आहे, जिथे त्यांच्या महागड्या कपड्यांचे, बूटांचे आणि ज्वेलरीचे संग्रहण केले आहे.
advertisement


