Ankita Walawalkar : अंकिता वालावलकर गुडन्यूज देणार? फॅमिली प्लॅनिंगबद्दल म्हणाली...
- Published by:Sachin S
Last Updated:
Ankita Walawalkar : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कधी गुडन्यूज देणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच नुकतंच एका मुलाखतीत अंकिताने फॅमिली प्लॅनिंगबद्दल आपलं मत मांडलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
मुलाखतीत कुणालला प्रश्न विचारण्यात आला, कुणाल तुझ्या आयुष्यात सुरुवातीला फिरण आणि म्युझिक महत्त्वाचं होतं. नंतर तिसरी गोष्ट अॅड झाली ती म्हणजे अंकिता. आता या तीन गोष्टी तुझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. पण आता चौथं कोणी अॅड होणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर देत कुणाल म्हणाला,"चौथ्यासाठी सगळेच फोर्स करत आहेत. पण आमचे काही कॅलक्युलेशन्स आहेत. काही प्लॅन आहेत".
advertisement
अंकिता वालावलकर यावेळी म्हणाली,"चौथं म्हणजे फॅमिली प्लॅनिंगबद्दल बोलायचं झालं तर मला माझ्या घरुन, माझ्या आईकडून खूप टोमने मिळत आहेत. विचार करा आता, लहान मुलं वाढवायला ऐवढे पैसे लागतात का? एवढा काय करिअरचा विचार करायचा? असे प्रश्न कुटुंबियांकडून येत आहेत. पण सध्या आपल्याला हे सर्व जमेल का? या गोष्टीची भीती वाटत आहे".
advertisement
कुणाल भगत पुढे म्हणाला,"सध्या चौथं कोणी महत्त्वाचं नाही. आम्हा दोघांनाही आमचे कुटुंबिय खूप महत्त्वाचे आहेत. आमचं करिअर महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी संगीत खूप जवळचं असलं तरी आता अंकिता खूप महत्त्वाची झाली आहे. अंकिता थोडी रुसली तरी मला काम होत नाही. म्युझिक, अंकिता आणि कुटुंब या तीन गोष्ट सध्या माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत".
advertisement


