लाहोरमध्ये जन्म, मुंबईत अखेरचा श्वास, धर्मेंद्रची हिरोईन; बॉलिवूडच्या सर्वात वयस्कर अभिनेत्रीचा मृत्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bollywood Oldest Actress Dies : लाहोरमध्ये जन्मलेली ही अभिनेत्री मुंबईत आली, मुंबईत तिनं करिअर केलं आणि आज त्याच मुंबईत तिनं अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या पहिल्या सिनेमाची हिरोईन काळाच्या पडद्याआड गेली.
बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार मंडळींनी सध्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेते प्रेम चोप्रा यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे अभिनेता गोविंदा देखील प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. अशातच बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
अभिनेत्री कामिनी कौशल या धर्मेंद्र यांचा को स्टार होत्या. त्यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं होतं. "माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट शहीदची नायिका कामिनी कौशल यांच्यासोबत पहिल्या भेटीचा पहिला फोटो… दोघांच्या चेहऱ्यावर हसू… एक प्रेमळ ओळख", असं म्हणत धर्मेंद्र यांनी कामिनी कौशल यांचे फोटो शेअर केले होते. धर्मेंद्र यांच्याबरोबरचं त्यांनी दिलीप कुमार, राज कपूर सारख्या दिग्गज कलाकारांबरोबरही अनेक सिनेमे केले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कामिनी कौशल सात वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या मोठ्या बहिणीचं एका कार अपघातात निधन झालं. तिला दोन मुलगी होत्या. बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या नवऱ्याबरोबर कामिनी कौशल यांनी लग्न केलं आणि त्या मुंबईत स्थायिक झाल्या. लाहोरमध्ये जन्म झालेल्या कामिनी कौशल यांनी त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईत अखेरचा श्वास घेतला.


